CNS Admiral Hari Kumar : भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरि कुमार यांनी आज अल्मा मेटर, राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या जूलियट स्क्वाड्रनचा दौरा केला. ॲडमिरल हरि कुमार चँपियन चीफ ऑफ स्टाफ बॅनर जिंकण्याच्या जल्लोषात सामील झाली. यावेळी त्यांनी सीएनएस कॅडेटसोबत पुश-अप्स मारून जल्लोष केला.
भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरि कुमार यांनी आपल्या अल्मा मेटर म्हणजे ज्या संस्थेतून प्रशिक्षण घेतले त्यामध्ये एका वेगळ्या अंदाज दिसले. राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या जूलियट स्क्वाड्रनच्या दौऱ्यात ॲडमिरल चँपियन चीफ ऑफ स्टाफ बॅनर जिंकल्याच्या जल्लोषात सामील झाले. एका उत्साहजनक क्षणी ॲडमिरलने उत्साही कॅडेट्ससोबत पारंपरिक पुश-अप्स मारत विजय साजरा केला.
ॲडमिरल आर हरि कुमार यांनी १७ जानेवारी रोजी पुण्यातील लोणावळ्यातील आयएनएस शिवाजीमध्ये एक ट्रान्स क्रिटिकल सीओ २ एयर कंडीशनिंग प्लांटचे उद्घाटन केले. या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना ॲडमिरल म्हणाले की, आज ट्रान्सक्रिटिकल सीओ २ एअर कंडीशनिंग प्लांटचे उद्घाटन करून आनंद झाला आहे. या काँप्रेसरला स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केले आहे.
संबंधित बातम्या