मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Navi Mumbai: १२५० रुपयांची थकबाकी न दिल्यानं सुपरवायझरची हत्या, नवी मुंबईतील घटना

Navi Mumbai: १२५० रुपयांची थकबाकी न दिल्यानं सुपरवायझरची हत्या, नवी मुंबईतील घटना

Jun 19, 2024 09:51 AM IST

Employee Kills Supervisor In Navi Mumbai: नवी मुंबईच्या कळंबोली परिसरात थकबाकी न दिल्याने एका मजुराने सुपरवायझरची हत्या केली.

नवी मुंबईत सुपरवायझरची हत्या
नवी मुंबईत सुपरवायझरची हत्या (HT_PRINT)

Navi Mumbai Kalamboli Murder: नवी मुंबईत अवघ्या १२५० रुपयांसाठी एका मजुराने सुपरवायझरची हत्या केली. ही घटना नवी मुंबईतील कळंबोलीच्या सेक्टर १४ येथे शुक्रवारी रात्री उशीरा घडली. या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकातून अटक केली, जिथून तो त्याच्या गावी पळून जाण्याच्या बेतात होता. याप्रकरणी कळंबोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

परवेझ अन्सारी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयत तळोजा येथील एका खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होता. तर, आरोपी सद्दाम अन्सारीसोबत जुनैद अन्सारी, मुमताज अन्सारी आणि मोहम्मद कौसर अन्सारी हे त्याच्या हाताखाली काम करत करायचे. दरम्यान, घटनेच्या दिवशी परवेझ हा कामगारांची थकबाकी देण्यासाठी सेक्टर १४ येथे पोहोचला. त्याने सर्व कामगारांचे पैसे दिले. परंतु, हिशोबापेक्षा १२५० रुपये कमी मिळल्याने सुद्दामने परवेझसोबत वाद घालायला सुरुवात केली. त्यावेळी परवेझने त्याची राहिलेली थकबाकी २० जून पर्यंत देतो, असे सांगितले. मात्र, त्यानंतर वाद शिगेला पोहचला आणि सुद्दामने रागाच्या भरात परवेझवर वार केले. त्यावेळी जुनैदने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुद्दामने त्याच्यावरही हल्ला केला.

ट्रेंडिंग न्यूज

इतर कामगारांनी जुनैद आणि परवेझ या दोघांनाही एमजीएम रुग्णालयात नेले, जिथे १५ जून रोजी उपचारादरम्यान परवेझचा मृत्यू झाला. तर, जुनैदवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आरोपी त्याच्या गावी पळून जाण्याच्या बेतात होता. परंतु, पोलिसांनी कल्याण स्थानकातून त्याच्या मुसक्या आवळल्या. हत्या, हत्येचा प्रयत्न आणि प्राणघातक हल्ला अशा गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आली.

वसईत दिवसाढवळ्या तरुणाकडून तरुणीची हत्या

वसईत मंगळवारी सकाळी एका तरुणाने भररस्त्यात २९ वर्षीय तरुणीची हत्या केली. आरोपी आणि मृत तरुणी यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांपूर्वी तरुणीने आरोपीसोबत असलेले प्रेमसंबंध तोडले. हाच राग डोक्यात ठेऊन आरोपीने तरुणीची हत्या केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशीही मागणी केली जात आहे.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर