क्रुरकर्मा पुत्र..! वृद्ध आईची कुदळीने वार करून हत्या, वडिलांनी असा वाचवला स्व:चा जीव
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  क्रुरकर्मा पुत्र..! वृद्ध आईची कुदळीने वार करून हत्या, वडिलांनी असा वाचवला स्व:चा जीव

क्रुरकर्मा पुत्र..! वृद्ध आईची कुदळीने वार करून हत्या, वडिलांनी असा वाचवला स्व:चा जीव

Updated Aug 19, 2024 03:50 PM IST

Nationl crime news : गावातील लोक सांगतात की, १० दिवसापूर्वीच तो समस्तीपूर आला होता. आधी तो चांगला होता मात्र पैशाची गरज जसजशी वाढू लागली तसे त्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला.

मुलाकडून आईची हत्या
मुलाकडून आईची हत्या

बिहारच्या मधुबनीमध्ये एका कलियुगी मुलाने पैशाच्या लालसेने आपल्या आईची हत्या केली. त्यानंतर वडिलांवरही कुदळीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही घटना हरलाखी पोलीस ठाणे क्षेत्रातील गोपालपूर गावातील आहे. येथे सनकी मुलाने पैशासाठी आपल्या वृद्ध आईने कुदळीने वार करून हत्या केली. रविवारी सकाळी ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ माजली असून सर्वांना धक्का बसला आहे. 

जिबछी देवी (६५, गोपालपूर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. आईची हत्या केल्यानंतर आरोपी लालबाबू यादव (३५) स्वत: पोलीस ठाण्यात हजर होत गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. 

आरोपी मानसिक आजारी -

ग्रामस्थांनी सांगितले की, आरोपी मानसिकदृष्ट्या आजारी आहे. तो समस्तीपूरमधून डीएलएड कोर्स करत होता. शिक्षणासाठी तो आई-वडिलांकडे वारंवार पैशाची मागणी करत होता. आईची हत्या करण्यापूर्वी आरोपीने वडिलांवरही हल्ला केला होता. मात्र पळून गेल्याने वडिलांचा जीव वाचला होता. गंगौर पंचायतीचे सरपंच शिवचंद्र मिश्रा यांनी सांगितले की, कुटूंबाची आर्थिक स्थिती खूपच दयनीय आहे. 

पोलिसांनी सांगितले की, आरोपी तरुणाला अटक करण्यात आली असून घटनेचा सखोल तपास केला जात आहे. एफएसएल टीमने घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. आरोपी तरुणाला कडक सुरक्षेत ठेवण्यात आले आहे, जेणेकरून तो पुन्हा हिंसक होणार नाही. एसडीपीओने म्हटले की, गावकऱ्यांशी चौकशी करून माहिती मिळवली जात आहे. 

समस्तीपूरमध्ये कोचिंगमध्ये शिकवत होता आरोपी -

आरोपी लालबाबू यादव समस्तीपूरमध्ये कोचिंग चालवत होता. तो सीटीईटी पास होता व डीएलएडमध्ये फायनलनंतर आपल्या आई-वडिलांकडे पैशाची मागणी करत होता.आई वृद्ध झाली होती, व्यवस्थिती चालूही शकत नव्हती. कंबरही वाकली होती. तर वडिलांच्या स्थितीतही तशीच होती. कशीतरी शेतरी करत ते उदरनिर्वाह करत होते. बेरोजगारी आणि आर्थिक तंगीचा सामना करत असलेला तरुण आपल्या शिक्षणासाठी कोचिंगमध्ये शिकवत होता.

गावातील लोक सांगतात की, १० दिवसापूर्वीच तो समस्तीपूर आला होता. आधी तो चांगला होता मात्र पैशाची गरज जसजशी वाढू लागली तसे त्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. वडील हिताय यादव आपल्या मुलीची व्यथा सांगताना म्हणाले की, घटनेच्या आधापासून तो पैशाची मागणी करत होता. पैशासाठी जमीन विकण्याचा हट्ट करत होता.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर