जन्मदाताच बनला कर्दनकाळ! पोटच्या दोन मुलांची कुऱ्हाडीने वार करून केली हत्या, पत्नीवरही केले वार
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  जन्मदाताच बनला कर्दनकाळ! पोटच्या दोन मुलांची कुऱ्हाडीने वार करून केली हत्या, पत्नीवरही केले वार

जन्मदाताच बनला कर्दनकाळ! पोटच्या दोन मुलांची कुऱ्हाडीने वार करून केली हत्या, पत्नीवरही केले वार

Nov 24, 2024 05:36 PM IST

मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्याच दोन मुलांची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली. पतीचे पत्नीच्या भांडणातून ही घटना घडली आहे.

वडिलांकडून दोन मुलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या
वडिलांकडून दोन मुलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या

मध्य प्रदेशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बडवानी जिल्ह्यात हैवान बनलेल्या पित्याने आपल्या दोन मुलांची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली आणि भांडणात पत्नीलाही जखमी केले. या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, किरकोळ भांडणानंतर पत्नी घराबाहेर पडली होती. यानंतर त्या व्यक्तीने सासरच्या घरी जाऊन तेथे मुलांची हत्या केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत आरोपी व्यक्तीही जखमी झाला आहे. जखमी पती-पत्नीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे.

ही घटना बडवानीतील बरला पोलिस ठाणे क्षेत्रातील आहे. संजय सिंह असे आरोपीचे नाव आहे. संजयचे पत्नीसोबत भांडण झाले. भांडण झाल्यानंतर पत्नी मुलांसह घर सोडून माहेरी गेली. भांडणानंतर काही दिवसांनी संजय सिंहही सासरच्या घरी पोहोचला आणि पुन्हा एकदा पत्नीशी भांडू लागला. रागाच्या भरात त्याने आपल्या मुलांना ठार केले. या भांडणात संजयने कुऱ्हाडीने वार करत आपला पाच वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांच्या मुलीची हत्या केली. हैवान संजय एवढ्यावरच थांबला नाही. त्याने पत्नीचीही हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र या हल्ल्यातून ती बचावली. या घटनेत संजयही जखमी झाला असून दोघांवरही उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती देताना बरला पोलिस ठाण्याचे प्रभारी सौरभ बाथम यांनी सांगितले की, आरोपी संजय हा महाराष्ट्रातील जळगावचा रहिवासी आहे. जळगावातील गणवरिया येथे राहणाऱ्या संजयने शनिवारी आपल्या मुलांचा कर्दनकाळ ठरला. जखमी संजयवर सेंधवा कम्युनिटी सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत, तर जखमी पत्नीला उपचारासाठी महाराष्ट्रात पाठविण्यात आले आहे. संजयच्या पत्नीची प्रकृती गंभीर असल्याने तिला उपचारासाठी दुसऱ्या राज्यात पाठवण्यात आले आहे.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर