मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Husband kill his wife: शरीर संबंधास पत्नी देत होती नकार; पतीने मित्रांच्या साह्याने केला पत्नीचा खून

Husband kill his wife: शरीर संबंधास पत्नी देत होती नकार; पतीने मित्रांच्या साह्याने केला पत्नीचा खून

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 18, 2022 05:18 PM IST

Bengaluru Crime कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बायको शरीर संबंधास नकार देत असल्याने, नवऱ्याने तिचा मित्राच्या मदतीने खून केला. तसेच तिचा मृतदेह दरीत नेऊन टाकला.

Bengaluru Crime
Bengaluru Crime (HT_PRINT)

बेंगळुरू : बेंगळुरू येथे एक धक्कादायक घटना उघडीकीस आली आहे. एका नवऱ्याने बायकोने शरीर संबंधास नकार दिल्याने, तिचा खून केला. बायकोचा खून केल्यानंतर तिचा मृतदेह हा शिराडी घाटातील दरीत फेकून दिला. यानंतर त्याने थेट पोलिस ठाणे गाठत बायको बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, आरोपी हा बिहार येथील रहिवाशी आहे. तो बेंगळुरू येथे इलेक्ट्रीशियनचे काम करतो. पृथ्वी राज सिंह असे आरोपीचे नाव आहे. तर ज्योति कुमारी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. दोघांचाही ९ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. पोलिसांनी खून का केला असे विचारल्यावर आरोपीने सांगितले की तो त्याच्या बायकोपासून नाराज होता. कारण, लग्न करताना तिने तिच्या वयाची माहिती लपवली होती.

लग्न झाल्यापासून शरीर संबंधास देत होती पत्नी नकार

आरोपीने पोलिसांना सांगितले की, ज्योती कुमारी ही त्याला असभ्य म्हणायची. तसेच शरीर संबंधास नेहमी नकार द्यायची. तसेच लग्न करताना पत्नी ज्योती हिने तिचे वय हे २८ सांगितले होते. मात्र, त्यानंतर ती त्याच्यापेक्षा १० वर्षांनी मोठी असल्याची माहिती मिळाली होती. तिचे वय हे ३८ वर्ष होते. या सोबतच ती त्याचा आणि त्याच्या आई वडिलांचा नेहमी अपमान करायची.

खून करण्यासाठी बिहार येथून मित्राला बोलावले

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने रागाच्या भरात ज्योतीला ठार मारण्याचा प्लॅन केला. या साठी त्याने त्याचा मित्र समीर कुमार याला बिहार येथून बोलावून घेतले. ३ ऑगस्ट रोजी दोघेही उडापी येथे गेले. त्या ठीकाही त्याने ज्योतीची गळा दाबून हत्या केली. या नंतर तिचा मृतदेह घाटातील दरीत फेकून दिला. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी त्याने पोलिस ठाणे गाठत ज्योती ही बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांना दिली.

पोलिसांत जाऊन पत्नी बेपत्ता असल्याची दिली तक्रार

आरोपीने पोलिसात जाऊन सांगितले की ज्योतिही अनेक वेळा घर सोडून न सांगता जायची. त्या नंतर ती वापस यायची. मात्र, यावेळी तिचा मोबाइल फोन हा बंद होता. यामुळे ती नेमकी कुठे गेली याची माहिती मिळत नव्हती. पोलिसांनी तपास चक्र फिरवताच तक्रार देणारा तिचा नवरा हा आरोपी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग