Chandrayaan 3 : चांद्रयान ३ ने चंद्राच्या जमिनीवर उतरून इतिहास रचला होता. या घटनेला आता एक वर्ष झाले आहे. या पार्श्वभमीवर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने चंद्राची काही छायाचित्रे शेअर केली होती. विशेष म्हणजे ही छायाचित्रे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरवरून घेण्यात आली आहेत. १४ जुलै रोजी चांद्रयान ३ चे प्रक्षेपण आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून करण्यात आले होते. हे लँडर २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्यास यशस्वी झले झाले होते. भारत असा करणारा चौथा देश ठरला होता.
नॅशनल स्पेस एजन्सीनं गुरुवारी लिहिलं की, 'उद्या चांद्रयान-३ च्या लँडिंग वर्धापनदिनानिमित्त इस्रो विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने काढलेली हजारो छायाचित्रे सादर करणार आहे.' संस्थेने सांगितले की, 'ही छायाचित्रे विक्रमवरील लँडर इमेजर (एल वन) आणि रोव्हर इमेजर (आर आय) वरून घेण्यात आली आहेत. पहिली तीन चित्रे एलआयची आहेत आणि शेवटची चित्रे आयआयची आहेत.
चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगच्या स्मरणार्थ, सरकारने २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. भारत शुक्रवारी पहिला अवकाश दिवस साजरा करत आहे. ज्या ठिकाणी सॉफ्ट लँडिंग झाले त्याला शिवशक्ती पॉईंट असे म्हणतात.
फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पीआरएल), अहमदाबाद आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या चमूने त्यांच्या संशोधनात म्हटले आहे की चांद्रयान-३ मोहिमेने चंद्राच्या सुरुवातीच्या विकासाचे रहस्य उघड केले आहे. टीमने आपल्या संशोधनात म्हटले आहे की, चांद्रयान-3 मोहिमेच्या प्रज्ञान रोव्हरकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्राची पृष्ठभाग मॅग्माच्या महासागराने झाकलेली होती. हे विश्लेषण चंद्रावरील माती मोजण्यासाठी होते. ही माहिती प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर नोंदवली आहे.
संशोधकांनी या डेटाचे विश्लेषण केले आणि त्यांना असे आढळले की चंद्राची माती फेरोन एनोर्थोसाइट या खडकाच्या प्रकारापासून बनलेली आहे. प्रज्ञान रोव्हरवरील अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (APXS) द्वारे केलेल्या मोजमापांचा वापर करून चंद्राच्या दक्षिणेकडील ध्रुवीय प्रदेशाजवळील मातीत प्रथम इन-सीटूच्या विपुलतेची नोंद केली आहे.
'नेचर' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात चंद्र मॅग्मा महासागराच्या गृहीतकाला आधार देणारे पुरावे दिले गेले आहेत, ज्यात असे भाकीत केले आहे की फिकट अनोर्थाइट प्लेजिओक्लेसच्या तरंगतेमुळे आदिम चंद्राचं कवच तयार झालं होतं. परंतु APXS ने चंद्रावर मॅग्नेशियम-समृद्ध खनिजे मोठ्या प्रमाणात असल्याचं उघड केलं आहे.