Bihar Politics: आगामी २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आपला मुलगा निशांत कुमार यांना लाँच करू शकतात अशी, राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. निशांत मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचा एकुलता एक मुलगा आहेत ते सक्रिय राजकारणात आल्यास आरजेडीला धक्का बसू शकतो. निशांत कुमार सामान्यपणे राजकीय कार्यक्रमात दिसत नाहीत. खूपच कमी वेळेला निशांत सार्वजनिक कार्यक्रमात वडील नितीश कुमार यांच्यासोबत दिसले होते. मात्र सीएम नीतीश कुमार नुकतेच आपला मुलगा निशांतला घेऊन हरियाणाला गेले, त्यानंतर निशांतच्या राजकीय प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
जेडीयू @२.० -
जेडीयूच्या काही नेत्यांनी आधी मागणी केली होती की, निशांत कुमार यांना जेडीयूमध्ये सक्रिय करावे, आणि त्यांना पक्षात मोठे पद दिले जावे. मात्र ७३ वर्षीय नितीश कुमार पक्षातील मागणीबाबत सहमती दर्शवली नाही. मात्र ताज्या घटनाक्रमानंतर म्हटले जात आहे की, परिस्थिती पाहून नितीश कुमार मुलाला संधी दिली जाऊ शकते. पार्टीच्या सुत्रानुसार निशांत औपचारिकरित्या जदयूमध्ये सामील होऊ शकतात. जेडीयूकडे दुसऱ्या फळीतील नेत्यांची वानवा असून नीतीश कुमार यांच्यानंतर निशांत त्यांची जागा घेऊ शकतात.
आगामी विधानसभा निवडणुकीत जेडीयूसमोर अनेक आव्हान आहेत. विशेषकरून लालू यादव आणि तेजस्वी यादव सारखे विरोधी नेत्यांना आव्हान देण्यासाठी जर नीतीश कुमार आपल्या मुलाला राजकारणात आणत असतील तर जेडीयूसाठी ही नवीन सुरुवात असू शकते. पार्टी सूत्रांनुसार जेडीयूला वाचवण्यासाठी नितीश यांच्याकडे शेवटचे शस्त्र आहे. त्याचबरोबर जेडीयूमधील नेतृत्वाचे संकटही संपेल आणि जेडीयू ताकदीने पुढे जाऊ शकते.
पंतप्रधान मोदींना नायजेरियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार! राणी एलिझाबेथनंतर उच्च सन्मान मिळणारे पहिलेच व्यक्ती
निशांतच्या राजकीय प्रवेशाने आरजेडीच्या गोटात खळबळ माजली आहे. बिहारच्या राजकारणात येणाऱ्या दिवसात युवा नेतृत्वाची गरज आहे. आरजेडी प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी म्हटले की, नितीश कुमार यांनी कोणालाही लाँच केले तरी येणाऱ्या काही दिवसात तेजस्वी त्यांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत. बिहारच्या जनतेने तेजेस्वीचे नेतृत्व स्वीकार केले आहे आणि नितीश कुमार यांच्या मुलाला यासाठी काही काळ जावे लागेल.
नितीश कुमार यांनी नेहमी परिवारवादाचा विरोध केला व आपल्या कुटूंबातील कोणत्याही सदस्याला राजकारणात येऊ दिले नाही. मात्र आता ते याचा स्थितीचा सामना करत आहे.