Jammu-Kashmir Earthquake : लडाखसह जम्मू-काश्मीर हादरले; ५.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Jammu-Kashmir Earthquake : लडाखसह जम्मू-काश्मीर हादरले; ५.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद

Jammu-Kashmir Earthquake : लडाखसह जम्मू-काश्मीर हादरले; ५.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद

Feb 20, 2024 08:47 AM IST

Jammu-Kashmir Earthquake : जम्मू काश्मीर आणि लडाख परिसरात रात्री मोठे भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ५.२ रिश्टर स्केल एवढी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू कारगिलच्या उत्तर-पश्चिमेस १४८ किलोमीटर अंतरावर होता.

Jammu-Kashmir Earthquake
Jammu-Kashmir Earthquake

Earthquake at Jammu-Kashmir and ladakh : देशाचा केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाख आणि जम्मू काश्मीरचा मोठा परिसर सोमवारी रात्री भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. अचानक आलेलल्या या भूकंपामुळे नागरिक घाबरून घराच्या बाहेर आले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ५.२ रिश्टर स्केल एवढी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू कारगिलच्या उत्तर-पश्चिमेस १४८ किलोमीटर अंतरावर होता. हे धक्के रात्री ९.३५ च्या सुमारास बसले. तर भूकंपाची खोली भूपृष्ठापासून १० किलोमीटर खाली होती.

जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी सुरू आहे. नागरिक आपल्या घरतात असतांना रात्री ९.३५ च्या सुमारास जमिनीला मोठे हादरे बसू लागले. अचानक आलेल्या भूकंपामुळे नागरिक घाबरले. बाहेर थंडी असतांना देखील नागरिक घराबाहेर पळत सुटले. श्रीनगरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. याआधी शुक्रवारी देखील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. भूकंपकाकावर याची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल एवढी होती. तर सोमवारी रात्री झालेल्या भूकंपाची तीव्रता ही ५.२ रिश्टर स्केल एवढी होती.

भूकंपाच्या धक्क्याची मालिका सुरू

१३ फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात ३.४ तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याचा केंद्रबिंदू जमिनीत ५ किमी खोलीवर होता. यापूर्वी ४ जानेवारीलाही जम्मू-काश्मीरमध्ये ३.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर