मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mahua Moitra: बिल्किस बानो महिला आहे की मुसलमान? देशानं ठरवावं; महुआ मोइत्रा यांचं ट्वीट

Mahua Moitra: बिल्किस बानो महिला आहे की मुसलमान? देशानं ठरवावं; महुआ मोइत्रा यांचं ट्वीट

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 18, 2022 11:56 AM IST

Mahua Moitra on Bilkis Bano: बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील ११ आरोपींची तुरुंगातून सुटका करण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयाचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत.

Mahua Moitra
Mahua Moitra

Mahua Moitra on Bilkis Bano: गुजरात सरकारच्या धोरणानुसार बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील ११ आरोपींची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. या घडामोडींचे तीव्र पडसाद देशात उमटत आहेत. खुद्द बिल्किस बानो हिनं काल या संदर्भात आपल्या भावनांना वाट करून दिल्यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांनी देशाला उद्देशून एक ट्वीट केलं आहे. ‘बिल्किस बानो ही महिला आहे की केवळ एक मुसलमान आहे. हे आता देशानंच ठरवावं,’ असं मोइत्रा यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यांचं हे ट्वीट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

२००२ मध्ये झालेल्या गोध्रा कांडानंतर गुजरातमध्ये दंगल उसळली होती. यावेळी गर्भवती असलेल्या २० वर्षीय बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. या प्रकरणी ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. राज्य सरकारच्या एका धोरणानुसार, या आरोपींची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे.

केंद्रातील भाजप सरकारवर तुटून पडणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘बिल्किस बानो ही महिला आहे की मुसलमान, हे आता देशानं ठरवावं,’ असं मोइत्रा यांनी म्हटलं आहे. ‘नितीमत्तेचा आणि न्यायाधीश असल्याच्या थाटात किंचाळणारे ते टीव्ही अँकर आता कुठे आहेत? ते का शांत आहेत? बिल्किस बानो प्रकरणावर पॅनल चर्चा घडवून आणण्याची परवानगी त्यांच्या कर्त्याकरवित्यांनी नाकारली आहे का? नेमकं काय झालं हे देशाला जाणून घ्यायचं आहे?,' अशा शब्दांत मोइत्रा यांनी मीडियावरही निशाणा साधला आहे.

‘एखाद्या महिलेसोबत असा न्याय कसा होऊ शकतो?’ असा प्रश्न मोइत्रा यांनी अमित शहा, नरेंद्र मोदींसह देशाला आणि देशातील नागरिकांना विचारला आहे.

WhatsApp channel