मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  BJP : भाजपा नेत्याच्या रामनवमी शोभायात्रेत नथुराम गोडसेचा फोटो, व्हिडीओ व्हायरल
BJP
BJP

BJP : भाजपा नेत्याच्या रामनवमी शोभायात्रेत नथुराम गोडसेचा फोटो, व्हिडीओ व्हायरल

31 March 2023, 11:35 ISTNinad Vijayrao Deshmukh

BJP News : हैदराबाद येथील भाजपचे निलंबित आमदार राजा सिंग यांनी राम नवमी निमित्त काढलेल्या निरवणुकीत नथुराम गोडसे यांचा फोटो लावला. या मिरवणुकीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

BJP MLA Raja Sing : कल देशभरात रामनवमी साजरी करण्यात आली. या निमित्त मिरवणूका काढण्यात आल्या. हैद्राबाद येथे देखील भाजपचे निलंबित आमदार राजा सिंग यांनी रामनवमी निमित्त मिरवणुकीचे आयोजन केले होते. मात्र, त्यांच्या निवडणुकीत नथुराम गोडसे यांचा फोटो लावल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या मिरवणुकीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. दरम्यान, हिंदू राष्ट्र तयार स्थापन करायचे आहे असे देखील राजा सिंग यांनी म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गुरुवारी श्रीराम नवमीचा उत्साह दिवसभर देशभरात साजरी करण्यात आली. हैदराबादच्या आसिफनगर भागात राजा सिंग यांनी देखील शोभा यात्रेचे आयोजन केले होते. येथील सीतारामबाग मंदिराजवळून ही शोभायात्रा निघाली होती ज्यामध्ये नथुराम गोडसेचा फोटो लावण्यात आला होता. या शोभायात्रेत जय श्रीरामच्या घोषणा मिरवणुकीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी दिल्या. या सोबतच जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी अशाही घोषणा होत्या. याच घोषणा दरम्यान मिरवणूक रथावर नथुराम गोडसेचा देखील फोटो होता. नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. याच नथुरामचा फोटो भाजप आमदारांच्या राम नवमीच्या मिरवणुकीत दिसल्याने चर्चांना उधाण आले आहे. या मिरवणुकीचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

रामनवमीच्या या शोभायात्रेत काही स्थानिक कलाकार, सांस्कृतिक मंडळम संगीत पथकासह डी.जे देखील लावण्यात आला होता. या मिरवणुकी दरम्यान, बोलतांना राजा सिंह म्हणाले, “आपल्या ज्येष्ठ मंडळींनी अपार परिश्रम आणि कष्ट सोसून प्रभू रामाचे मंदिर साकारले आहे. आता आपल्याला आपलं लक्ष्य काशी आणि मथुरा येथील मंदिरांवर केंद्रीत करायचं आहे. त्यासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे. हिंदूंनी कुणालाही घाबरू नये. आपल्याला हिंदू राष्ट्र स्थापन करायचं आहे.

मिरवणुकीतील त्यांच्या या भाषणावरून आणि नथुराम गोडसे यांच्या फोटोवरून त्यांचावर टीका होऊ लागली आहे. या संदर्भात विरोधकांनी त्यांना जाब विचारला आहे. गांधी हत्तेचे समर्थक असा आरोप विरोधक करत आहेत.

 

विभाग