natalie dau ran : अवघ्या १२ दिवसांत तब्बल १ हजार किमी धावून नवा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या नताली डाऊला आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रमाणपत्राचे वेध लागले आहेत. थायलंड, मलेशिया आणि सिंगापूर असा मोठा प्रवास नताली डाऊने केवळ १२ दिवसांत पूर्ण केला आहे. या काळात तिला अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागले. कडक उन्हाचा सामना करताना डाऊचे शूजही वितळले होते.
५२ वर्षीय डाऊ हीचा हा ऐतिहासिक प्रवास ५ जून रोजी सिंगापूरमध्ये संपला. बीबीसीशी बोलताना नताली डाऊ म्हणाली, 'चार दिवसांत आज पहिल्यांदाच मी हे काम पूर्ण केले आहे का ? असा प्रश्न मलाच पडला आहे. मला क्रीडा क्षेत्राशी निगडीत आव्हाने आवडतात, परंतु कधीकधी उद्भवणाऱ्या समस्यांमुळे माझ्या या कामात अनेक अडथळे मला पार करावे लागले.
नताली डाऊ म्हणली, 'तुम्ही पहिले आलात की शेवटचा याने काही फरक पडत नाही. तुम्ही असे काहीतरी केले आहे जे जगातील ०.०५ टक्के लोक कधीही करू शकणार नाहीत. विशेष म्हणजे नताली डाऊला धावताना ३५ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाचा सामना करावा लागला. या कडक उन्हात पहिल्याच दिवसांपासून तिला पाठीच्या दुखण्याने ग्रासले होते. तर प्रचंड उन्हामुळे तिचे बूटही वितळले होते. एवढेच नाही तर तिसऱ्या दिवशीच त्यांना यूटीआयचा देखील त्रास झाला होता.मात्र, ती थांबली नाही.
नताली डाऊने ग्लोबल चॅरिटी GRLS साठी ५० हजार डॉलर पेक्षा अधिक निधी या धावण्यातून उभारला आहे. या रकमेमुळे महिलांना खेळातून त्यांची कौशल्ये विकसित करण्यास मदत होणार आहे. या प्रवासादरम्यान, डाऊने दररोज किमान ८४ किमी अंतर कापले. या काळात ती तिच्या सहकाऱ्यांशी सतत संपर्कात राहिली. याशिवाय तिच्या सुरक्षेत आणि यशात तिच्या टीमचाही मोठा वाटा असल्याची भावना तिने व्यक्त केली.
संबंधित बातम्या