Nashik: खेकडे पकडायला गेलेल्या २ अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू, नाशिक येथील घटना!-nashik 2 minor boys die of drowning while catching crabs ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Nashik: खेकडे पकडायला गेलेल्या २ अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू, नाशिक येथील घटना!

Nashik: खेकडे पकडायला गेलेल्या २ अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू, नाशिक येथील घटना!

Sep 23, 2024 04:47 PM IST

Two Minor Boys drowned in farm pond: नाशिक येथील संजीवनगरमध्ये खेकडे पकडायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडल्याने मृत्यू झाला.

खेकडे पकडायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू
खेकडे पकडायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

Nashik News: अंधेरीचा राजाच्या विसर्जनदरम्यान बोट कोसळून अनेकजण पाण्यात बुडल्याची घटना रविवारी (२२ सप्टेंबर २०२४) घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली. या घटनेला काहीच तास उलटले तोच, नाशिक येथून धक्कादायक माहिती समोर आली. शेत तळ्यात खेकडे पकडायला गेलेल्या दोन मुलांना पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी अंबड-सातपूर लिंक रोडवर असलेल्या संजीवनगरमध्ये घडली. या घटनेने परिसरात खळबळ माजली.

मिळालेल्या माहितीनुसार, पाण्यात बुडालेली मुले ८ आणि ११ वयोगटातील असून ते विराटनगर येथे वास्तव्यात होते. रविवारी दुपारी दोन्ही मुले आपल्या मित्रांसह घराजवळील शेत तळ्यात खेकडे पकडायला गेले. पंरतु, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. परंतु, या मुलांचे प्राण वाचवण्यात त्यांना अपयश आले, अशी माहिती पीटीआयने दिली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

नाशिक: गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान दोन जणांचा नदीत बुडून मृत्यू

नाशिक शहरात गणेश मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी दोन जणांचा बुडून मृत्यू झाला. ओंकार चंद्रकांत गाडे (वय, १७) आणि स्वयम भैय्या मोरे (वय,१८), अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या दोन जणांची नावे आहेत. हे दोघेही मित्रांसह वालदेवी नदीवर हत्तीमुखी देवतेच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेले असता ही घटना घडली. या मुलांनी नदीत प्रवेश केला, पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. स्थानिक लोक, पोलीस आणि अग्निशमन दलाने प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही, अशी माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने दिली.

लातूर: बैलाला अंघोळ घालण्यासाठी गेलेले बाप-लेक पाण्यात बुडाले

लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात बैलाला अंघोळ घालण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गेल्या आठवड्यात मंगळवारी (१७ सप्टेंबर २०२४) घडली. मिळालेल्या माहितीनुसार, त्रिपती बाबुराव पवार (वय, ४२) आणि त्यांचा मुलगा नामदेव (वय, १२) हे दोघेही बैलाला अंगोळ घालण्यासाठी गावाजवळच्या पाझर तलावात गेले. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने नामदेव पाण्यात बुडाला. नंतर नामदेवला वाचवण्यासाठी त्रिपती यांनीही पाण्यात उडी घेतली. मात्र, दोघांचाही दुर्देवी मृत्यू झाला.

Whats_app_banner
विभाग