मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Narendra Modi swearing ceremony :राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदींचा रविवारी शपथविधी सोहळा: कधी अन् कुठे पाहता येणार LIVE

Narendra Modi swearing ceremony :राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदींचा रविवारी शपथविधी सोहळा: कधी अन् कुठे पाहता येणार LIVE

Jun 08, 2024 11:39 PM IST

PM Modi's Oath Ceremony : नरेंद्र मोदी उद्या (९ जून) संध्याकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. जाणून घेऊया कधी व कुठे हा सोहळा लाईव्ह पाहता येणार..

 नरेंद्र मोदी उद्या तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधान पदाची शपथ
नरेंद्र मोदी उद्या तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधान पदाची शपथ (Raj K Raj/HT photo)

नरेंद्र मोदी रविवारी ९ जून रोजी राष्ट्रपती भवनात सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी सव्वासात वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  त्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. राष्ट्रपती भवनात ९ जून २०२४ रोजी संध्याकाळी ७.१५ वाजता पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. 

ट्रेंडिंग न्यूज

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भाजप संसदीय पक्षाच्या नेतेपदी मोदी यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करणारे पत्र सादर केल्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी शुक्रवारी मोदी यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली. मोदींसह एनडीएच्या नव्या सरकारमधील मंत्रिमंडळही रविवारी संध्याकाळी शपथ घेणार आहेत.

अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्यासह पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे तेलुगू देसम पक्षाचे एन चंद्राबाबू नायडू, जदयूचे नितीशकुमार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह मित्रपक्षांशी सल्लामसलत करत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण टीव्ही वृत्तवाहिन्यांवर होणार आहे. हे यूट्यूब आणि इतर अधिकृत सोशल मीडिया हँडलवरही स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल.

नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा कधी, कुठे पाहता येईल -

सर्व राष्ट्रीय वृत्तवाहिन्या रविवारी संध्याकाळी सव्वासात वाजता टीव्ही आणि त्यांच्या सोशल मीडिया चॅनेलवर मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करतील. सार्वजनिक सेवा प्रसारक दूरदर्शन देखील त्यांच्या टीव्ही आणि यूट्यूब चॅनेलवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करेल.

राष्ट्रपतींच्या यूट्यूब चॅनेल आणि एक्स अकाऊंटवरही या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तसेच पंतप्रप्रधान नरेंद्र मोदींच्या सोशल मीडिया अकाउंटवरूही सोहळ्याचे स्ट्रीमिंग केले जाणार आहे.

नव्याने स्थापन झालेल्या एनडीए सरकारकडून उद्या कॅबिनेट मंत्र्यांची यादीही जाहीर केली जाणार आहे. नव्या मंत्रिमंडळात शहा आणि सिंग यांच्यासारख्या नेत्यांकडे पक्षांतर्गत निश्चित मानले जात असले तरी शिवराजसिंह चौहान, बसवराज बोम्मई, मनोहरलाल खट्टर आणि सर्बानंद सोनोवाल यांच्यासारखे लोकसभा निवडणूक जिंकलेले माजी मुख्यमंत्री सरकारमध्ये सहभागी होण्याचे प्रबळ दावेदार आहेत.

तेलुगू देसम पक्षाचे राममोहन नायडू, जदयूचे ललन सिंह, संजय झा आणि रामनाथ ठाकूर आणि लोकजनशक्ती पक्षाचे चिराग पासवान हे मित्रपक्ष नव्या सरकारमध्ये सहभागी होऊ शकतात.

टी-२० वर्ल्डकप २०२४