Fact Check : काँग्रेसच्या केरळ युनिटसह अनेक सोशल मीडिया कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा भाजपच्या मार्गदर्शक मंडळात नुकताच समावेश करण्यात आल्याचा दावा करणारा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. हा दावा सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, हे दोघेही भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांच्यासमवेत २०१४ पासून भाजपच्या मार्गदर्शक मंडळाचा भाग असल्याचे बूमने केलेल्या फॅक्ट चेकमध्ये आढळले आहे. काँग्रेसच्या केरळ युनिट @INCKerala ने ट्विटरवर भाजपच्या वेबसाइटच्या स्क्रीनशॉटसह लिहिले, 'Modi and Rajnath Singh officially entered Marg Darshak Mandal according to BJP's website. Is this indication that the floor test is going to fail and is this a dry run of the page post the disaster?'
मराठी अनुवादः भाजपच्या वेबसाइटनुसार, मोदी आणि राजनाथ सिंह अधिकृतपणे मार्गदर्शक मंडळात सामील झाले आहेत. फ्लोअर टेस्ट अयशस्वी होण्याचे हे लक्षण आहे का?
पोस्ट पहा
संग्रहण लिंक पहा
काँग्रेसने याला द्याव्याला आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या विधानाशी जोडले आहे. तसेच फेसबुकवर या बाबत एका युजरने लिहिले की, 'मोहन भागवत यांच्या या मोठमोठ्या वक्तव्यानंतर भाजपने नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांना मार्गदर्शक मंडळाकडे पाठवले - भाजपच्या अधिकृत वेबसाइट.'
पोस्ट पहा
संग्रहण लिंक पहा
बूमच्या फॅक्ट चेकमध्ये असे आढळून आले की नरेंद्र मोदी व राजनाथ सिंह हे ऑगस्ट २०१४ पासून भाजपच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य आहेत. व्हायरल दाव्याची चौकशी करताना, बूमला असे आढळले की ऑगस्ट २०१४ मध्ये भाजपने मार्गदर्शक मंडळाची घोषणा केली होती. त्यानंतर त्यात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह या पाच नेत्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला. पक्षाला दिशा देण्याच्या उद्देशाने त्याची निर्मिती करण्यात आली. भाजपने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. २८ ऑगस्ट २०१४ रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे सांगण्यात आले की भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाच्या कार्यात मार्गदर्शन करण्यासाठी खालील वरिष्ठ नेत्यांची मार्गदर्शक मंडळ म्हणून नियुक्ती केली आहे - अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्रभाई मोदी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि राजनाथ सिंह.
प्रेस रिलीज पाहण्यासाठी येथे क्लिक करा
वास्तविक, अमित शहा २०१४ मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर भाजपमध्ये अनेक महत्त्वाचे बदल झाले. पक्षात नवीन संसदीय मंडळ स्थापन करण्यात आले, जे सर्वोच्च निर्णय घेणारे मंडळ आहे. त्यात वाजपेयी, अडवाणी, जोशी यांची नावे काढून टाकण्यात आली. त्याऐवजी त्यांना मार्गदर्शक मंडळाचा भाग बनवण्यात आले. या संदर्भात, आम्हाला २७ ऑगस्ट २०१४ रोजी प्रकाशित झालेला इंडिया टुडेचा अहवाल देखील सापडला. भाजपच्या संसदीय मंडळातून तीन ज्येष्ठ नेत्यांची नावे वगळण्यात आल्याने पक्षातील एका युगाचा अंत झाल्याचे सांगण्यात आले.
१२ सदस्यीय नवीन संसदीय मंडळात नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांच्या नावाचा समावेश असल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे. याशिवाय, बूमला वेबॅक मशीनवर २०२१ च्या भाजप वेबसाइटच्या मार्गदर्शक मंडळ पृष्ठाची संग्रहण आवृत्ती सापडली. यामध्ये नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांच्या नावाचा समावेश आहे.
संबंधित बातम्या