Narendra Modi oath ceremony: मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी ८००० पाहुण्यांची उपस्थिती, ७ देशांच्या प्रमुखांना निमंत्रण-narendra modi oath taking ceremony 7 foreign leaders among 8 000 guests for modis oath ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Narendra Modi oath ceremony: मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी ८००० पाहुण्यांची उपस्थिती, ७ देशांच्या प्रमुखांना निमंत्रण

Narendra Modi oath ceremony: मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी ८००० पाहुण्यांची उपस्थिती, ७ देशांच्या प्रमुखांना निमंत्रण

Jun 08, 2024 05:01 PM IST

Narendra Modi oath-taking ceremony: एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी (Narendra Modi) ९ जूनला तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमाला देशविदेशातील ८ हजार पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले असून ७ देशांचे प्रमुखही उपस्थित राहणार आहेत.

मोदींचा उद्या शपथविधी
मोदींचा उद्या शपथविधी (Bloomberg)

Narendra Modi oath ceremony : नरेंद्र मोदी यांचा सलग तिसऱ्यांदा शपथविधी सोहळा ९ जून रोजी राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या शपथविधी सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज व मनोरंजन विश्वातील कलाकारांसह आठ हजारांहून अधिक पाहुणे उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजप संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) घटक पक्षांनी पाठिंब्याचे पत्र सादर केले. त्यानंतर मोदी यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली.

मोदींच्या या शपथविधी सोहळ्यालापरदेशी पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. बांगलादेश, भूतान,श्रीलंका तसेच मालदीवसह अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. देशातील अन्य राजकीय पक्षांचे नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. एकूण ८०००हजार लोकं सोहळ्याला उपस्थित राहाणार असल्याचं सांगितलं जातंय. रविवारी संध्याकाळी ७वाजून१५मिनिटांनी मोदी यांचा शपथविधी सोहळा होणार आहे.

शुक्रवारी एनडीएच्या (NDA)संसदीय पक्षाच्या नेतेपदी मोदी यांची निवड करण्यात आली. त्यानंतर मोदी यांनी राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर राष्ट्रपतींना रविवारी त्यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण दिलं. शपथग्रहण सोहळ्याला अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहाणार आहेत. यासाठी दिल्लीत सुरक्षेचा कडकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीत नो फ्लाईग झोन घोषित करण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनची सुरक्षाही व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या उद्याच्या शपथविधी सोहळ्यासाठी बांग्लादेश,श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरीशस आदि देशांचे प्रमुख उपस्थित राहाणार आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू,भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ आणि सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष वावेल रामखेलावान उपस्थित राहणार आहेत.

 

ओडिशा राज्याचा मुख्यमंत्री आज ठरणार -

ओडिशा मुख्यमंत्रिपदाच्या नावाबाबत सस्पेन्स असतानाच, राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या एका ज्येष्ठ आदिवासी आमदाराने शुक्रवारी सांगितले की, ७८ सदस्यीय विधिमंडळ पक्षाची शनिवारी बैठक होणार आहे. संबलपूर जिल्ह्यातील कुचिंडा येथील ज्येष्ठ आमदार रविनारायण नाईक यांनी शुक्रवारी सांगितले की, १० जून रोजी भाजप सरकारच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी राज्य विधिमंडळ पक्षाची राजधानी भुवनेश्वरयेथे बैठक होणार आहे. नव्या मुख्यमंत्रिपदाबाबत संसदीय पक्ष शुक्रवारी निर्णय घेण्याची शक्यता असून, शनिवारी औपचारिक घोषणा केली जाईल, असे नाईक यांनी सांगितले.

 

Whats_app_banner