मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Narendra Modi oath: NDA च्या मंत्रिमंडळात मोदींसोबत कोण-कोण घेणार शपथ; महाराष्ट्रातून कोण? यादी आली समोर

Narendra Modi oath: NDA च्या मंत्रिमंडळात मोदींसोबत कोण-कोण घेणार शपथ; महाराष्ट्रातून कोण? यादी आली समोर

Jun 09, 2024 03:24 PM IST

नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.पंतप्रधान मोदी यांच्यासोबत जवळपास ४१ खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये नितीन गडकरी, पियुष गोयल, राजनाथ सिंह, ज्योतिरादित्य शिंदे आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी आदि नेत्यांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदींसोबत मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या खासदारांची यादी आली समोर
पंतप्रधान मोदींसोबत मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या खासदारांची यादी आली समोर (PTI)

नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींचा शपथविधी आज सायंकाळी सव्वा सात वाजता राष्ट्रपती भवनात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास ४१ खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.  यामध्ये २० मंत्री रिपीट केले आहेत तर अनेक नव्या चेहऱ्यांना पसंती दिली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याच्या काही तास आधी भारतीय जनता पक्षाने नवनिर्वाचित खासदारांना चहापानासाठी राजधानी दिल्लीतील नवनिर्वाचित पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलावले होते. यातील बहुतांश खासदारांचा पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता असून ते आज राष्ट्रपती भवनात शपथ घेतील.

नितीन गडकरी, पियुष गोयल, राजनाथ सिंह, ज्योतिरादित्य शिंदे आणि जेडीएसनेते एचडी कुमारस्वामी हे आज पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची संभाव्य यादी खालीलप्रमाणे -

1. अमित शहा
2. मनसुख मंडाविया
3. अश्विनी वैष्णव
4. निर्मला सीतारामण
5. पीयूष गोयल
6. जितेंद्र सिंह
7.शिवराज सिंह चौहान
8. हरदीप सिंह पुरी
9. एचडी कुमारस्वामी
10.चिराग पासवान
11. नितिन गडकरी
12.राजनाथ सिंह
13.ज्योतिरादित्य सिंधिया
14. किरण रिजिजू
15. गिरिराज सिंह
16.जयंत चौधरी
17. अन्नामलाई
18. एम.एल.खट्टर
19. सुरेश गोपी
20. जीतन राम मांझी
21. रामनाथ ठाकुर 
22. जी किशन रेड्डी
23. बंदी संजय
24. अर्जुन राम मेघवाल
25. प्रह्लाद जोशी
26. चन्द्रशेखर चौधरी
27. डॉ. चन्द्र शेखर पेम्मासानी
28. राम मोहन नायडू किंजरापु
29. रवनीत सिंह बिट्टू
30. जितिन प्रसाद
31. पंकज चौधरी
32. बीएल वर्मा
33. ललन सिंह
34. सर्बानंद सोनोवाल
35. अनुप्रिया पटेल
36. प्रताप राव जाधव
37. अन्नपूर्णा देवी
38. रक्षा खडसे
39. शोभा करंदलाजे
40. कमलजीत सहरावत
41. राव इंद्रजीत सिंह
42. रामदास आठवले
43. हर्ष मल्होत्रा

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नामनिर्देशित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चहापान बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलेले नेते अमित शहा, जेपी नड्डा, बीएल वर्मा, पंकज चौधरी, शिवराज सिंह चौहान, अन्नपूर्णा देवी आणि अर्जुन राम मेघवाल यांचा समावेश आहे.  ज्योतिरादित्य शिंदे, मनोहरलाल खट्टर, रक्षा खडसे, नित्यानंद राय, हर्ष मल्होत्रा भगीरथ चौधरी आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी, भाजपचे नेते किरेन रिजिजू, जितिन प्रसाद, रवनीत सिंह बिट्टूदेखील बैठकीला उपस्थित होते.

बैठकीला भाजप नेते राजनाथ सिंह, राव इंद्रजीत सिंह, अजय टम्टा, हिंदुस्तानी अवाम मोर्चा (सेक्युलर) चे संस्थापक जीतनराम मांझी आणि लोजपा (रामविलास) प्रमुख चिराग पासवान उपस्थित होते.

चहापानाला उपस्थित राहिलेल्या बहुतांश नेत्यांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.

चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीने नरेंद्र मोदी यांच्या भाजपसरकारला पाठिंबा दिला आहे. लोकसभेच्या १६ जागा जिंकणारे नायडू किंगमेकर ठरले आहेत. १२ जागा जिंकणारे जेडीयू प्रमुख नितीशकुमार यांचाही सरकारमध्ये मोलाचा वाटा आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग