नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ७२ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. दिल्लीतील या सोहळ्याला सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात मोदी कॅबिनेट ३.० चा शपथविधी सोहळा संपन्न झाला.
PM Modi Oath ceremony Live: नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
PM Modi Oath ceremony Live:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भाजप नेते गिरिराज सिंह,निर्मला सीतारामण आणि हरदीप सिंह पुरी यांच्याह सर्व निमंत्रित पाहुणे राष्ट्रपती भवनाच्या परिसरात दाखल झाले आहेत. आज सायंकाळी सव्वा सात वाजता नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतील.
PM Modi Oath ceremony Live:एनसीपी नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले की, आम्हाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार मंत्रालयाबाबत माहिती मिळाली होती. मात्र मी याआधी केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलो आहे. त्यामुळे हे पद घेणे थोडे कठीण आहे. मात्र ज्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्या चुकीच्या आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत.
किन्नर आणि ट्रांसजेंडर्संना राष्ट्रपती भवनात मोदी३.०च्या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. देशाच्या वेगवेगळ्या राज्यातील २० किन्नर आणि ट्रांसजेंडर या सोहळ्याला उपस्थित राहतील. यूपी सरकारमध्ये दर्जा प्राप्त मंत्री सोनम (किन्नर) च्या नेतृत्वात या सर्व तृतीयपंथी शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीत दाखल झाल्या आहेत.
मोदी ३.०कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील ६ खासदारांना संधी मिळू शकते. यामध्ये भाजपचे वरिष्ठ नेते नितिन गडकरी सलग तिसऱ्यांदा मंत्री बनणार आहेत. त्याचबरोबर खासदार पीयूष गोयल,पुण्याचे पहिल्यांदाच खासदार बनलेले मुरलीधर मोहोल आणि रक्षा खडसे यांचा या यादीत समावेश आहे. शिवसेना शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव आणि आरपीआयकडून रामदास आठवले मोदी सरकारचा हिस्सा बनतील.