Modi Oath Swearing-In Ceremony 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी ८ जूनला तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. हा सोहळा दिल्ली येथे होणार आहे. मोदी यांच्या सोबत मंत्री मंडळातील काही नेते देखील शपथ घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक मंत्रीपद तर शिवसेनेला एक राज्यमंत्री व एक कॅबिनेट पद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणुकीत एनडीएने २९२ जागा जिंकून बहुमताचा आकडा ओलांडला आहे. त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. मोदी यांच्या मंत्रीमंडळाने बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राजीनामा दिला आहे. त्यांनी तो स्वीकारला असून सध्या नरेंद्र मोदी हे काळजीवाहू पंतप्रधान आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथ विधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. त्यांच्या या शपथविधीला जगातील अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे . श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. विक्रमसिंघे व शेख हसीना या दोघांनीही पंतप्रधान मोदींनी दिलेले निमंत्रण स्वीकारले आहे. ४ जून रोजी भारताच्या १८ व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. नवीन सरकारच्या शपथविधीपर्यंत ते सध्याचे कार्यवाहक पंतप्रधान राहतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंका आणि बांगलादेश व्यतिरिक्त नेपाळ आणि मॉरिशसच्या पंतप्रधानांना, श्रीलंकेचे राष्ट्रपती आणि भूतानच्या राजाला या आठवड्याच्या शेवटी त्यांच्या शपथविधीसाठी आमंत्रित केले आहे, पंतप्रधान मोदींनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांना शपथविधीसाठी आमंत्रित केले आहे. याशिवाय श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि भूतानचे राजे डुक ग्याल्पो जिमे खेसर नामग्याल वांगचुक यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
याआधी बुधवारी पंतप्रधान मोदी यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केल्यानंतर या सर्व नेत्यांचे आभार मानले. या नेत्यांशी आपण दूरध्वनीवरूनही बोललो, असेही त्यांनी ट्विटच्या करून माहिती दिली होती. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) विजयावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेंन, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया. मेलोनी, जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासह ७५ हून अधिक जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.
राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान सुनक यांनी मोदींशी स्वतंत्रपणे फोनवर संवाद साधला. तर झेलेन्स्की, तैवानचे अध्यक्ष लाय चिंग ते, इटलीचे पंतप्रधान मेलोनी आणि चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही मोदींना अभिनंदनाचे संदेश पाठवले. लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल बायडेन यांनी मोदी आणि एनडीएचे अभिनंदन केले. बायडेन यांनी 'X' वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री वाढत आहे कारण दोन्ही बाजूंनी चांगल्या भविष्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मोदी आणि एनडीएचे त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन आणि या ऐतिहासिक निवडणुकीत सहभागी झालेल्या अंदाजे ६५ कोटी मतदारांचे अभिनंदन." श्रीलंका, मालदीव, इराण आणि सेशेल्सचे राष्ट्रपती आणि नेपाळ, बांगलादेश, भूतान, म्यानमार आणि मॉरिशसच्या पंतप्रधानांनी मोदींना शुभेच्छा संदेश पाठवले आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदींनी ट्विट करून सर्वांचे आभार मानले.
पंतप्रधान मोदींच्या २०१४ च्या शपथविधी समारंभासाठी सर्व सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रित करण्यात आले होते. २०१९ मध्ये, मॉरिशस आणि किर्गिस्तानसह सर्व BIMSTEC देशांना आमंत्रित करण्यात आले होते. यापूर्वी, राष्ट्रपती विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावरून २१ जुलै २०२३ रोजी भारत भेट दिली होती. पदभार स्वीकारल्यानंतर विक्रमसिंघे यांचा हा पहिला दौरा होता, ज्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटी आणि अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर इतर भारतीय मान्यवरांशी चर्चा यांचा समावेश होता.
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या नेत्यांनी बुधवारी एकमताने मोदी यांची सत्ताधारी आघाडीचा नेता म्हणून निवड केली. गरीब, महिला, तरुण, शेतकरी आणि समाजातील उपेक्षित घटकांच्या सेवेसाठी सरकारची वचनबद्धता अधोरेखित करणारा ठराव मंजूर करण्यात आला. ज्यामुळे त्यांचा सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला. नोदी या आठवड्याच्या शेवटी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची तयारी करत आहेत. निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नसले तरी पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएने ५४३ सदस्यांच्या लोकसभेत २९० पेक्षा जास्त जागा मिळवल्या. कनिष्ठ सभागृहात बहुमताचा आकडा २७२ जागा आहे.
संबंधित बातम्या