सरकारच्या विरोधासाठी विदेशी मदत घेतली नाही, मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल, ‘INDIA’ समोर ठेवला NDA चा अर्थ
Narendra modi on rahul gandhi : काँग्रेसने पक्षांचा वापर आपल्या हितासाठी केलाआम्ही विरोधी पक्षात असताना सकारात्मक राजकारण केलं.सरकारचा विरोध करण्यासाठी विदेशी मदत आम्ही घेतली नाही,असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केला आहे.
Narendra modi explained meaning of nda : आज दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही दल म्हणजेच एनडीएतील घटक पक्षांची बैठक पार पडली.या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या एकजुटीवर जोरदार हल्ला चढवला. मोदी म्हणाले की, देशात स्थिरता आणण्यासाठी एनडीएची स्थापना झाली होती. एनडीए कोणाच्या विरोधात बनलेले नाही. परंतू, विरोधक हे सत्तेसाठी, भ्रष्टाचारासाठी आणि एनडीएला विरोध करण्यासाठी एकत्र आलेले आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
देशातएनडीएचेस्थिर आणि मजबूत सरकार असल्याने जगाचा भारतावर विश्वास वाढला आहे.काँग्रेसने पक्षांचा वापर आपल्या हितासाठी केलाआम्ही विरोधी पक्षात असताना सकारात्मक राजकारण केलं. कधीही नकारात्मक राजकारणाचा रस्ता धरला नाही. विरोधात राहून सरकारचे घोटाळे समोर आणले. पण, सरकारचा विरोध करण्यासाठी विदेशी मदत आम्ही घेतली नाही, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केला आहे.
मोदींनी सांगितला एनडीएचा अर्थ -
मोदी म्हणाले एनडीएच्या स्थापनेत अडवाणींची भूमिका महत्वाची होती. याला अटलजींचा वारसा आहे. एनडीएच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. NDA म्हणजे N- New India, D- Developed Nation, A- People's Aspiration आहे, असा मोदींनी विरोधकांच्या इंडियाच्या विरोधात एनडीएचा अर्थ सांगितला.
२०२४ मध्ये ५० टक्के मते मिळतील - मोदी
आपला देश येणाऱ्या २५ वर्षात मोठ्या आव्हानांना सामोरे जाणार आहे. हे लक्ष्य विकसित आणि आत्मनिर्भर भारताचे आहे. कोट्यावधी भारतीय नव्या संकल्पनेच्या उर्जेने भरलेले आहेत. पुढील २५ वर्षाच्या कालखंडात ‘एनडीए’ची भूमिका महत्वाची असेल. एनडीएला २०१४ मध्ये सुमारे ३८ टक्के आणि २०१९ मध्ये ४५ टक्के मते मिळाली होती, २०२४ मध्ये ५० टक्क्यांहून अधिक मते मिळतील, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.