पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७१ मंत्र्यांसह सलग तिसऱ्यांदा राष्ट्रपती भवनात शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांना पदाची शपथ दिली. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत.
नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ७२ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. दिल्लीतील या सोहळ्याला सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात मोदी कॅबिनेट ३.० चा शपथविधी सोहळा संपन्न झाला.
मोदीच्या मंत्रिमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ७२ मंत्र्यांचा समावेश असून यामध्ये ३० कॅबिनेट मंत्री, ३६ राज्यमंत्री, ५ स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. यात देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच सामाजिक गटांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. त्यात इतर मागासप्रवर्गाचे २७, अनुसूचित जातीचे १०, अनुसूचित जमातीचे ५ आणि अल्पसंख्याकांचे ५ मंत्री आहेत. १
मोदी कॅबिनेट ३.० मध्ये ४३ मंत्र्यांचा समावेश आहे ज्यांनी संसदेत ३ टर्म किंवा त्यापेक्षा जास्त काळ काम केले आहे, त्यापैकी ३९ यापूर्वी भारत सरकारमध्ये मंत्री होते. १८ ज्येष्ठ नेते विविध मंत्रालयाचा भार सांभाळणार आहेत.
मंत्रिमंडळात अनेक माजी मुख्यमंत्री आणि ३४ मंत्र्यांचा समावेश आहे ज्यांनी राज्य विधिमंडळात काम केले आहे आणि २३ राज्यांमध्ये मंत्री म्हणून काम केले आहे. मोदी कॅबिनेटमधील सर्व मंत्र्यांची यादी पाहा.
संबंधित बातम्या