मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dhirendra Shastri : तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधानामुळं बागेश्वर बाबा गोत्यात

Dhirendra Shastri : तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधानामुळं बागेश्वर बाबा गोत्यात

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 30, 2023 08:16 PM IST

Nana Patole on Bageshwar Baba : संत तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळं बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री महाराज गोत्यात आला आहे.

Bageshwar Baba
Bageshwar Baba

दिव्यशक्ती आणि चमत्काराचे दावे करणारा बागेश्वर धामचा बाबा धीरेंद्र शास्त्री हा संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळं पुरता गोत्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं चमत्काराच्या मुद्द्यावरून कोंडी केल्यानंतर आता काँग्रेसनं तुकोबारायांच्या अपमानावरून धीरेंद्र शास्त्रीला घेरलं आहे. 

‘संत तुकाराम महाराजांना त्यांची बायको रोज मारायची, त्यामुळं ते देव देव करायला लागले, असं वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यानं काल त्याच्या अनुयायांसमोर बोलताना केलं. त्यामुळं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. काँग्रेस धीरेंद्र शास्त्रीवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'हा बागेश्वर बाबा भोंदू आणि भंपक आहे. त्यानं वारकरी संप्रदायाचा आणि पर्यायानं महाराष्ट्राचा अवमान केला आहे. काँग्रेस पक्ष त्याचा निषेध करतो. तुकाराम महाराजांच्या अपमानाबद्दल त्यानं तात्काळ माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

'जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राच्या वारकरी संत परंपरेमधील महान संत आहेत. सतराव्या शतकात त्यांनी अभंग आणि कीर्तनाच्या माध्यमातून भक्ती आणि समाजप्रबोधनाचं महत्त्वपूर्ण कार्य केलं. छत्रपती शिवाजी महाराज त्यांना गुरुस्थानी मानत होते. संपूर्ण वारकरी संप्रदायासाठी आणि महाराष्ट्रासाठी संत तुकाराम महाराज वंदनीय आहेत. त्यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून बागेश्वर बाबानं महाराष्ट्राचा अपमान केला आहे, असं पटोले म्हणाले.

'काही दिवसांपूर्वी नागपूर इथं येऊन या भोंदू बाबानं दिव्य दरबाराच्या नावाखाली अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचा उद्योग केला होता. त्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाम मानव यांनी आव्हान दिलं असता या भोंदू बाबानं नागपुरातून पळ काढला होता. या पळपुट्या भोंदू बाबाचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे. त्यानं तात्काळ माफी मागितली पाहिजे, असं पटोले म्हणाले.

IPL_Entry_Point

विभाग