‘या’ देशात दुष्काळ जिवावर उठला! पोट भरण्यासाठी हत्ती, हिप्पोपोटॅमस व झेब्रासह ७०० प्राणी मारण्याचे आदेश-namibia draught government order to kill 700 animals elephant zebra hippo ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ‘या’ देशात दुष्काळ जिवावर उठला! पोट भरण्यासाठी हत्ती, हिप्पोपोटॅमस व झेब्रासह ७०० प्राणी मारण्याचे आदेश

‘या’ देशात दुष्काळ जिवावर उठला! पोट भरण्यासाठी हत्ती, हिप्पोपोटॅमस व झेब्रासह ७०० प्राणी मारण्याचे आदेश

Aug 31, 2024 07:31 PM IST

Draught : नामिबियात इतका भीषण दुष्काळ पडला आहे की, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सरकारआता प्राण्यांची शिकार करणार आहे. येथील सरकारने ७२३ मोठी जनावरे मारण्याचे आदेश दिले आहेत.

नामिबीयात भीषण दुष्काळ
नामिबीयात भीषण दुष्काळ

दक्षिण आफ्रिका  खंडातील नामिबिया देशात इतका दुष्काळ पडला आहे की, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. नामिबियात गेल्या १०० वर्षांत असा दुष्काळ कधीच पडला नव्हता. या देशात लोकांकडील अन्नधान्य संपले असून उपासमारीची समस्या निर्माण झाली आहे. सरकारी धान्य गोदामेही रिकामी झाली आहे. त्यामुळे हत्ती, झेब्रा, हिप्पोपोटॅमस सह ७०० जनावरे मारण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघाने नामिबियाची निम्मी लोकसंख्या उपासमारीशी झुंजत असल्याचे म्हटले होते.

नामिबियाच्या पर्यावरण मंत्रालयाने सोमवारी जाहीर केले की दुष्काळग्रस्त भागात ७२३ जनावरे मारली जातील आणि त्यांचे मांस वितरित केले जाईल. अन्नधान्याचा तुटवडा असल्याने दुष्काळी भागात मदतीसाठी मटण वाटप करावे लागत आहे. मृत प्राण्यांमध्ये ३० हिप्पो, ६० म्हशी, ५० इंपाला, १०० ब्लू वाइल्डरबीस्ट , ३०० झेब्रा, ८३ हत्ती आणि १०० इतर प्राण्यांचा समावेश आहे.

व्यावसायिक शिकारी सफारीवर जाऊन या प्राण्यांची शिकार करतील. मांगेतीत आतापर्यंत १५७ जनावरांची कत्तल करण्यात आली आहे. तर महांगो राष्ट्रीय उद्यानात २०, क्वांडोमध्ये ७०, बफेलोमध्ये ६, मुडुमोमध्ये ९ प्राण्यांची शिकार करण्यात आली आहे. अल निनोमुळे दक्षिण आफ्रिकेतील ६८ दशलक्ष लोकांना फटका बसला आहे. दुष्काळाचा परिणाम २०२४ च्या सुरुवातीपासून सुरू झाला. त्यानंतर पिके उद्ध्वस्त झाली आणि हळूहळू अन्नधान्याचा तुटवडा जाणवू लागला. सदर्न आफ्रिकन डेव्हलपमेंट कम्युनिटीनुसार १६ देश दुष्काळग्रस्त आहेत.

झिम्बाब्वे, झांबिया आणि मलावी या देशांनी यापूर्वीच अन्नसंकट जाहीर केले आहे. तर अल निनोमुळे संकट आणखी वाढू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नामिबिया सरकारचे म्हणणे आहे की, प्राण्यांना मारल्याने लोकांना अन्न मिळेल. याशिवाय वन्यप्राण्यांवरील त्यांच्या संख्येवरही दुष्काळाचा परिणाम कमी होणार आहे. अनेक ठिकाणी जनावरे पाण्यासाठी एकमेकांना मारण्याच्या तयारीत आहेत.

प्राण्यांना साधनसंपत्ती मिळाली नाही तर ते मानवी वस्त्यांमध्ये घुसून लोकांचे नुकसान करतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दुष्काळाचा सामना करण्यासाठी हत्तींची संख्या कमी करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सुके येथील परिस्थिती पाहता संयुक्त राष्ट्रसंघानेही मदतीला यावे. दुष्काळाचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने ही कांगारूंना मारण्याची परवानगी दिली.

मारण्याच्या प्रक्रियेत आधीच कमकुवत असलेले प्राणी मारले जातात. त्यासाठी व्यावसायिक शिकारींना कंत्राट दिले जाते. यातून सरकारला मिळणारे मांस उपासमारीला सामोरे जाण्यासाठी वापरले जाते. आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये हत्तींची संख्या खूप आहे. तर, नामिबियातील लोकांची लोकसंख्या सुमारे २.३ दशलक्ष आहे. इथले लोक फक्त शिकार आणि शेतीवर अवलंबून आहेत. वेळेवर पाऊस न झाल्याने येथे अनेकदा अन्नधान्याचे संकट निर्माण होते.

विभाग