बापरे..! शेतात आढळलेल्या सापाचा ठेचला फणा; एका तासातच नागिनीने घेतला नागाच्या मृत्यूचा बदला
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बापरे..! शेतात आढळलेल्या सापाचा ठेचला फणा; एका तासातच नागिनीने घेतला नागाच्या मृत्यूचा बदला

बापरे..! शेतात आढळलेल्या सापाचा ठेचला फणा; एका तासातच नागिनीने घेतला नागाच्या मृत्यूचा बदला

Published Oct 30, 2024 07:02 PM IST

सापाच्या मृत्यूनंतर तुम्ही चित्रपट आणि कथांमध्ये नागिनीची बदला ऐकला असेल, पण यूपीच्या बरेली जिल्ह्यातून असा प्रकार प्रत्यक्षात समोर आला आहे. येथे शेतात एक साप आला आणि त्याला तरुणाने ठार मारले. मात्र तासातच त्या युवकाचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे.

तरुणाला सर्पदंश
तरुणाला सर्पदंश

snake News : सापाच्या मृत्यूनंतर तुम्ही चित्रपट आणि कथांमध्ये सापाचा बदला ऐकला असेल, पण यूपीच्या बरेली जिल्ह्यातून अशी एक घटना वास्तवात समोर आली आहे. येथे शेतात एक साप आढळल्यानंतर तरुणाने त्याला ठार मारले. तरुणाने काठीने सापाचा फणा ठेचला.  तासाभरानंतर दुसऱ्या सापाने त्याच्या हातात चावा घेतल्याने युवकाचा मृत्यू झाला. सर्पदंशानंतर या तरुणाला घरी जाणे तर दूरच पाणीही मागता आले नाही व त्याचा काही क्षणात मृत्यू झाला. या घटनेने  गावात एकच खळबळ उडाली असून ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने तरुणाच्या घरात शोककळा पसरली होती.

ही घटना बरेली जिल्ह्यातील  क्यारा भागात घडली. येथे राहणारे गोविंद कश्यप (वय ३२) हे शेती व शेतमजुरी करतात. मंगळवारी सकाळी ते गावातील रहिवासी अतुल सिंग यांच्या शेतात भात कापणी करून भुसा गोळा करीत होते. तेवढ्यात एक साप बाहेर आला. साप  फणा काढून उभा होता.  सापाला पाहताच गोविंदने त्याला काठीने मारायला सुरुवात केली. 

गोविंदने सापाचा फणा ठेचून  काढत त्याला ठार मारले. यानंतर मृत सापाला  लांब टाकून तो जेवायला गेला. काही वेळाने आणखी एक साप आला. ती नागीन असल्याचे सांगितले जात आहे. नागीन मृत सापाजवळ गेली व थोडा वेळ तेथेच थांबली. जेवायला गेलेला गोविंद तासाभरानंतर शेतात परतला तेव्हा त्या नागिनीने गोविंदच्या हाताला कडकडून चावा घेतला.  नागिनीने नागाच्या मृत्यूचा एका तासातच बदला घेतला. 

साप चावल्यानंतर गोविंद घराच्या दिशेने धावत सुटला पण वाटेतच तो बेशुद्ध पडला. गोविंद पाणीही मागू शकला नाही. गोविंदला चावल्यानंतर साप जाऊन कुठेतरी लपला. गोविंदला त्रास होताना पाहून शेतमालकाने घरच्यांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या कुटुंबियांनी त्याला डॉक्टरांकडे नेले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. साप चावल्यानंतर त्याचे विष गोविंदच्या संपूर्ण शरीरात पसरले होते. डॉक्टरांनी गोविंदला मृत घोषित केले. गोविंदच्या मृत्यूनंतर घरात गोंधळ उडाला होता. गोविंदला चावलेल्या सापाचा गावकऱ्यांनी शोध घेतला मात्र साप कुठेच सापडला नाही. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर