देशातील 'या' गावात गूढ आजाराने १७ नागरिकांचा मृत्यू! काय आहे कारण ?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  देशातील 'या' गावात गूढ आजाराने १७ नागरिकांचा मृत्यू! काय आहे कारण ?

देशातील 'या' गावात गूढ आजाराने १७ नागरिकांचा मृत्यू! काय आहे कारण ?

Jan 21, 2025 10:40 AM IST

Mysterious illness in Jammu : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून 'गूढ' आजाराची दहशत पसरली आहे. या आजाराने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे. हा आजार नेमका काय आहे याची तपासणी करण्यासाठी एक समिती देखील स्थापन करण्यात आली आहे.

देशातील 'या' गावात गूढ आजाराने १७ नागरिकांचा मृत्यू! काय आहे कारण ?
देशातील 'या' गावात गूढ आजाराने १७ नागरिकांचा मृत्यू! काय आहे कारण ? (HT_PRINT)

Mysterious illness in Jammu : जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे गेल्या काही दिवसांपासून एका गूढ आजाराची दहशत पसरली आहे. या आजारामुळे आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे.  या मृत्यूमुळे दहशतीचे वातावरण असून या गावात तपासणी करण्यासाठी केंद्रीय समिती देखील दाखल झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार या आजारामागे व मृत्यूमागे कीटकनाशक हे एक कारण असू शकतं अशी शक्यता प्राथमिक तपासानंतर वर्तवण्यात आली आहे.  गावातील एका विहीरीत  कीटकनाशकांचे अवशेष सापडल्याचे गोळा करण्यात आलेल्या नामुन्यांमध्ये आढळले आहेत, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेल्या लोकांनी या विहीरीतील  पाणी प्यायले होते. राजौरीतील एका गावात १७ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. यात १४ मुलांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्र्यांनी या घटनेचे गांभीर्याने दखल घेतली आहे. तसेच या घटनेच्या चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहे.  

विहीरीतील पाणी प्यायल्याने १७ जणांचा मृत्यू झाल्याचा संशय वर्तवण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचीही माहिती आहे. प्रदूषित पाणी व झालेले  मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचा संबंध  असल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, या प्रकरणी तज्ञ समिति  तपास करत आहे.  तज्ज्ञांच्या मते हे मृत्यू गूढ नसून त्यामागे व्हायरस किंवा बॅक्टेरिया असण्याची शक्यता आहे.

मृत्युमुखी पडलेले  नागरिक हे राजौरी जिल्ह्यातील बधल गावातील तीन कुटुंबातील होते. सध्या स्थानिक प्रशासनाने हि विहीर  सील करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंतरमंत्रालयीन पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते आणि या पथकाला राजौरीपासून ५५ किमी अंतरावर असलेल्या या गावाला भेट देण्याचे आदेश दिले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर