मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  pm modi : पंतप्रधान मोदींसाठी मुस्लिम मुलीची तपश्चर्या, १२ ज्योतिर्लिंगांना भेटी देत करणार जलाभिषेक

pm modi : पंतप्रधान मोदींसाठी मुस्लिम मुलीची तपश्चर्या, १२ ज्योतिर्लिंगांना भेटी देत करणार जलाभिषेक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 01, 2024 01:21 PM IST

muslim girl jyotirlinga darshan for pm modi third term : देशात येत्या काही दिवसांत लोकसभा (loksabha election) निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, एक मुस्लिम मुलगी पंतप्रधान नरेंद्र मोदी ही पुन्हा निवडणूक यावे या साठी ज्योतिर्लिंग यात्रेवर निघाली आहे.

पंतप्रधान मोदींसाठी मुस्लिम मुलीची तपश्चर्या, १२ ज्योतिर्लिंगांना भेटी देत करणार जलाभिषेक
पंतप्रधान मोदींसाठी मुस्लिम मुलीची तपश्चर्या, १२ ज्योतिर्लिंगांना भेटी देत करणार जलाभिषेक

muslim girl jyotirlinga darshan for pm modi third term : देशात येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024) होणार आहेत. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. प्रमुख नेत्यांचे समर्थक देखील त्यांच्या आवडत्या नेत्यांना विजयी करण्यासाठी तयारीला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांचा देखील मोठा चाहता वर्ग आहे. यात हिंदू धर्मीयांप्रमाणेच मुस्लिम धर्मीय आहेत. अशीच एक पीएम मोदी यांची चाहती असलेली मुस्लिम मुलगी ही ते पुन्हा निवडणूक यावे या साठी हजारो किलोमीटर असलेल्या ज्योतिर्लिंगांच्या यात्रेवर निघाली असून ती या ठिकाणी जलाभिषेक करणार आहे.

ही मुलगी (muslim girl jyotirlinga darshan)तिच्या एका सहकाऱ्यासह या लांबच्या प्रवासाला निघाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून यावेत, अशी तिची इच्छा आहे. या साठी ती हा खडतर प्रवास करणार आहे. ही मुलगी मुंबईहून सायकलवरून निघाली असून ती गुरुवारी सायंकाळी उशिरा मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यात पोहोचली. प्रसारमाध्यमांनी तिच्याशी संवाद साधला असून तिने पंतप्रधान मोदी यांचे कौतुकही केले. प्रभू रामाच्या अभिषेकवेळीही तिने मुंबई ते अयोध्या असा पायी प्रवास केला होता.

जेएनयूमध्ये मध्यरात्री राडा! ABVP आणि डाव्या संघटनांमध्ये तुफान हाणामारी; भांडणाचे व्हिडिओ व्हायरल

शबनम शेख (shabanam sheikh) असे या मुस्लिम तरुणीचे नाव आहे. ती तिच्या मित्रासोबत बरवानी जिल्ह्यातील सेंधवा येथील राष्ट्रीय महामार्गावर पोहोचली. डोक्यावर हिजाब आणि सायकलवर भगवे झेंडे घातलेल्या शबनमने सांगितले की ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Naredra Modi) यांची ती खूप मोठी फॅन आहे. नरेंद्र मोदी यांना तिला तिसऱ्यांदा पंतप्रधान होतांना पहायचे आहे. या साठी ती भगवान शंकराला जलाभिषेक करणार असून या साठी ती देशभरातील १२ ज्योतिर्लिंच्या प्रवासाला निघाली आहे. या ठिकाणी अभिषेक करून ती प्रार्थना करणार आहे. सध्या महाराष्ट्रातील (Maharashtra) दोन ज्योतिर्लिंगांचे दर्शन तिने घेतले आहे. आता ती मध्य प्रदेशातील ओंकारेश्वरला जात आहे. यानंतर उज्जैन महाकालला जाण्याचा तिचा बेत आहे.

भाजपला देणगी देणे माजी न्यायाधीशांना पडले महागात! इलेक्टोरल बाँडच्या नावाखाली अडीच कोटींनी गंडवले

रोज ८० ते ९० किमी सायकल प्रवास

शबनम सायकलवर दररोज ८० ते ९० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. ही संपूर्ण यात्रा तिला पुढील ७ ते ८ महिन्यात पूर्ण करायची आहे. तिच्या प्रवासाचे वर्णन करताना शबनम शेख म्हणाली की ती एक भारतीय सनातनी मुस्लिम मुलगी आहे. ती १२ ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी मुंबईहून निघाली आहे. महादेवाचे दर्शन घेणे हे तिचे उद्दिष्ट आहे, तसेच आगामी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान (Loksabha Election 2024) व्हावेत ही तिची इच्छा आहे, त्यासाठी ती महादेवाचे दर्शन घेणार आहे. पीएम मोदींचे कौतुक करताना ती म्हणते की, जर आपण त्यांच्या खास गुणांबद्दल सांगितले तर एक संपूर्ण मालिका तयार होईल.

मुस्लिमही बांधव करतायेत तिची खाण्यापिण्याची व्यवस्था

शबनम म्हणाली की या प्रवासात सर्व हिंदू आणि मुस्लिम तिला साथ देत आहेत. शबनम म्हणाली, 'काही दिवसांपूर्वी मी मुंबईहून अयोध्येला रामजींच्या दर्शनासाठी जात असताना पोलिस आणि प्रशासनाने चांगले सहकार्य केले. महाराष्ट्र पोलीस असो वा मध्य प्रदेश किंवा उत्तर प्रदेश. तिन्ही ठिकाणी भाजप सरकार असून प्रशासनाने देखील तिचे कौतुक केले आहे. त्यामुळे मोदी पुन्हा सरकारमध्ये यावे आणि पंतप्रधान व्हावे, अशी माझी इच्छा आहे. यात्रेदरम्यान सर्व हिंदू-मुस्लिम एकमेकांना भेटून एकमेकांना साथ देत आहेत. अनेक मुस्लिमही त्यांचे स्वागत करतात आणि अन्नपाण्याची व्यवस्था करतात, असे देखील शबनम म्हणाली.

IPL_Entry_Point