रामलला प्राण प्रतिष्ठेदरम्यान मोठी घोषणा, अयोध्येत मशीद बांधण्याची तारीख ठरली; योजनाही तयार
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  रामलला प्राण प्रतिष्ठेदरम्यान मोठी घोषणा, अयोध्येत मशीद बांधण्याची तारीख ठरली; योजनाही तयार

रामलला प्राण प्रतिष्ठेदरम्यान मोठी घोषणा, अयोध्येत मशीद बांधण्याची तारीख ठरली; योजनाही तयार

Jan 22, 2024 01:59 PM IST

ayodhya mosque construction : अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापणा सोहळा पार पडला आहे. आता येथे बांधण्यात येणाऱ्या मशिदीची तारीख देखील ठरली आहे. या मशिदीचे नाव पैगंबर मुहम्मद यांच्या नावावर 'मस्जिद मुहम्मद बिन अब्दुल्ला' असे ठेवण्यात येणार आहे.

ayodhya mosque construction
ayodhya mosque construction

ayodhya mosque construction : रामललाच्या प्राणप्रतिष्ठादरम्यान अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या मशिदीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन या वर्षी मे महिन्यापासून भव्य मशिदीचे बांधकाम सुरू करणार आहे. ही मशीद पूर्ण होण्यासाठी ३ ते ४ वर्षे लागू शकतात. हाजी अराफत शेख यांच्या अध्यक्षतेखालील इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनच्या विकास समितीद्वारे मशीद प्रकल्पाचे काम पाहिले जात आहेत. या मशिदीसाठी निधी उभारण्यासाठी क्राऊड फंडिंग वेबसाइट सुरू करण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Pran Pratishtha : रामभक्तांची स्वप्नपूर्ती! अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू रामचंद्रांची विधीवत प्रतिष्ठापना

अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या या मशिदीचे नाव पैगंबर मुहम्मद यांच्या नावावरून 'मस्जिद मुहम्मद बिन अब्दुल्ला' असे ठेवण्यात येणार आहे. शेख म्हणाले, 'लोकांमधील वैर आणि द्वेष दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करा अथवा नका करू, आम्हाला लोकांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम भावना निर्माण करायची आहे. आपल्या मुलांना आणि लोकांना चांगल्या गोष्टी शिकवल्या तर हा मतभेत आपोआप संपेल, असे ते म्हणाले.

Raj Thackeray : राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर राज ठाकरे म्हणाले, ‘आज कारसेवकांचे आत्मे…’

आम्ही निधीसाठी कोणाशीही संपर्क साधला नाही: IICF

झुफर अहमद फारुकी हे IICF चे अध्यक्ष आहेत. ते म्हणाले की आमच्या संस्थेने निधी बाबत कोणाशीही संपर्क साधला नाही. फारुकी म्हणाले, 'आम्ही अद्याप कोणाशीही संपर्क साधलेला नाही. निधी उभारण्यासाठी कोणत्याही प्रकारची मोहीम सुरू करण्यात आलेली नाही. आयआयसीएफचे सचिव अतहर हुसेन आहेत. ते म्हणाले, 'मशीद बांधण्यास विलंब झाला हे खरे आहे. याचे कारण आम्हाला माशीदीच्या रचनेत पारंपारिक घटक जोडायचे होते. विशेष म्हणजे मशिदीच्या आवारात ५०० खाटांचे रुग्णालयही बांधले जाणार आहे.

दुसरीकडे, प्रभू रामाच्या बालस्वरूपाच्या मूर्तीच्या अभिषेक सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत पार पडला आहे. या समारंभानंतर ते जाहीर सभा घेणार असून या ठिकाणी ते भाषण करणार आहेत. यानंतर पंतप्रधान कुबेर टिळा येथेही जाणार आहेत. मंदिराच्या बांधकामाशी संबंधित कामगारांशीही पंतप्रधान चर्चा करणार आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर