आजकाल तरुणांमध्ये जिमची इतकी क्रेझ वाढली आहे की, बॉडी बनवण्यासाठी ते काहीही करू शकतात. मग त्यात मृत्यूही होऊ दे. तुम्ही ऐकले असेल की, बॉडी बनवण्यासाठी लोक स्टेरॉईड इंजेक्शनचा वापर करतात. मात्र यावेळ अनोखे प्रकरण समोर आले आहे. एका तरुणावर बॉडी बनवण्याचे भूत असे काही सवार झाले की, त्याने ३९ नाणी व ३७ चुंबक गिळले. या तरुणाचे वय केवळ २६ वर्ष आहे.
या तरुणाला मागील २० दिवसापासून वारंवर उलटी व पोटदुखीची त्रास होत होता. त्यानंतर त्याचे सीटी स्कॅन केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ऑपरेशन करून त्याच्या पोटातून ३९ नाणी व ३७ चुंबक काढण्यात आले. या तरुणावर दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात शस्त्रक्रिया केली गेली. डॉक्टरांनी सांगितले की, बॉडी बिल्डिंगमध्ये मदत होण्यासाठी त्याने ही नाणी व चुंबक गिळले होते.
तरुणाच्या कुटूंबीयांनी सांगितले की, त्याच्यावर मानसिक उपचार सुरू आहेत. पोटदुखीचा त्रास होत असल्याने डॉक्टरांनी एक्स रे काढण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सीटी स्कॅन केले गेले. यामध्ये समजले की, नाणी व चुंबक गिळल्याने त्याच्या आतड्या पूर्णपणे ब्लॉक झाल्या आहेत. रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
डॉक्टरांनी सर्जरी सुरू केल्यानंतर रुग्णाच्या लहान आतड्यात दोन भागात नाणी व चुंबक दिसले. चुंबकीय प्रभावाने दोन लूप एकत्र ओढले गेले होते व आतड्यांचे नुकसान झाले होते. त्यानंतर आतडे कापून सर्व नाणी व चुंबक बाहेर काढले गेले. डॉक्टरांनी सांगितले की, या व्यक्तीच्या पोटातून एकूण ३९ नाणी (१,२, ५ रुपयांचे) आणि ३७ चुंबक (दिल, गोलाकार, षटकोणी आणि त्रिकोण आकाराचे) काढले गेले.
संबंधित बातम्या