Suchana Seth Son Murder News: माइंडफुल एआय लॅब (Mindful AI Lab) ची CEO सूचना सेठ या महिलेवर आपल्या चार वर्षाच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या वृत्ताने खळबळ माजली असून आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधिन वलसन यांनी सांगितले की, आरोपी महिला सीईओ सूचना सेठ, जिने गोव्यातील एका हॉटेलमध्ये आपल्या मुलाची हत्या केली होती. ती न्यायालयाच्या एका निर्णयाने नाराज होती. पोलिसांनी सांगितले की, घटस्फोट झाल्यानंतर कोर्टाने पतीला मुलास भेटण्याची परवानगी दिली होती. यामुळे नाराज महिला सीईओने मुलाची हत्या केली. आरोपी महिला व तिच्या पतीचा २०२२ मध्ये घटस्फोट झाला आहे.
गोवा कोर्टाने आरोपी महिलेला ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुलाच्या वडिलांनी मृत बालकाची ओळख पटवली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांचा विवाह २०१० मध्ये झाला होता २०२२ पासून त्याच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली. न्यायालयाने दर रविवारी आपल्या मुलाला भेटण्यास त्यांना परवानगी दिली होती.
या निर्णयामुळे नाराज सूचनाने मुलाची हत्या केली. त्यानंतर आपल्या डाव्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर तिचे मन बदलले. तिने मुलाचा मृतदेह एका बॅगमध्ये पॅक केला. त्यानंतर ३० हजार रुपये खर्च करून टूरिस्ट टॅक्सी बुक केली व बेंगळुरूकडे रवाना झाली.
३९ वर्षीय सूचना सेठ ६ जानेवारी रोजी आपल्या चार वर्षाच्या मुलासाह गोव्यातील एका हॉटेलात पोहोचली होती. मात्र दोन दिवसानंतर जेव्हा तिने हॉटेल सोडले त्यावेळी तिच्यासोबत मुलगा नव्हता. मात्र तिच्याकडे एक मोठी बॅग होती. तिने हॉटेल कर्मचाऱ्यांना सांगून एक कॅब बुक करायला सांगितली. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तिला प्लाईटने जाण्याचा सल्ला दिला. मात्र तिने त्यांचे न एकता कॅब बुक केली. रस्ते मार्गाने ६०० किलोमीटरचा प्रवास करण्यास जवळपास १२ तास लागतात. तर प्लेनने ९० मिनिटात पोहोचता येते.
महिला हॉटेलमधून गेल्यानंतर हॉटेल कर्मचारी तिच्या रुमची सफाई करत होते. त्यावेळी त्यांना रुममध्ये रक्ताचे डाग दिसले. प्रकरणाचा गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी याची सूचना पोलिसांनी दिली. पोलिसांनी हॉटेलमध्ये पोहोचून महिलेशी कॅब चालकांच्या माध्यमातून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी चालकाशी कोंकणी भाषेत संवाद साधला जेणेकरून तिला काही समजू नये. पोलिसांनी तिला तिच्या मुलाबाबत विचारले तेव्हा तिने सांगितले की, तो तिच्या मित्राच्या घरी आहे. दोन दिवसांनी परत येणार आहे. मात्र तिने आपल्या दोस्ताचा पत्ताही चुकीचा देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चालकाने पोलिसांशी संपर्क कायम ठेवून समजदारपणा दाखवला. पोलिसांनी त्याला आपली गाडी जवळच्या पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर त्याने गाडी कर्नाटकातील चित्रदुर्ग पोलीस ठाण्यात गाडी नेली. पोलिसांनी तिची बॅग तपासली असता त्यामध्ये मुलाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.
सूचना सेठ द माइंडफुल AI लॅबची संस्थापक आहे. चार वर्षाहून अधिक काळापासून ती या संस्थेचे नेतृत्व करत आहे. जी आर्टिफिशियल इंजेलिजेंस क्षेत्रात कार्यरत आहे. सूचना सेठने दोन वर्षे बर्कमॅन क्लेन सेंटरमध्येही काम केले आहे. तिने बोस्टन, मॅसाचुसेट्समध्येही आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि रिस्पॉन्सिबल मशीन लर्निंग एथिक्स आणि गर्वनन्समध्ये योगदान दिले आहे.
संबंधित बातम्या