जर्मनीचा TikTok स्टार नोएल रॉबिन्सन (Noel Robinson) नुकताच मुंबईत येऊन गेला. त्याने नुकताच एका गाण्यावर थिरकतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. मुंबई पोलीस दलात डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेले पोलीस क़ॉन्स्टेबल अमोल कांबळे याच्यासोबत डान्स करतानाचा हा भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नोएल रॉबिन्सन लिहितो, ‘हॅलो इंडिया… अखेर मी इथे आलोय.’ नोएल रॉबिन्सनचं मुंबई ८ मे रोजी आगमन झालं. तेव्हापासून तो भारताच्या आर्थिक राजधानीत जवळजवळ सगळीकडेच डान्स करत फिरतोय. या शहरातील अनेक अनोळखी लोकांसोबत तो डान्स करतोय. कधी मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना, कधी रस्त्यावर तर कधी बाजारात तो डान्स करतोय. असाच डान्स करता करता तो मुंबई पोलीस दलात 'डान्सर' म्हणून प्रसिद्ध असलेले अमोल कांबळे यांच्यापर्यंत तो पोहोचला. आणि मग काय विचारता. दोेघांनाही डान्सचं वेड. त्यामुळे अमोल कांबळे यांनी TikTok स्टार नोएल रॉबिन्सनसोबत दोनदा डान्स केले. त्यापैकी एक व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे.
'तुम्ही कोणत्याही देशातून भारतात आलेला असाल तरी मुंबई पोलिसांसमोर गुन्हा करताना पकडले गेल्यास तुम्ही पकडले जाताच. आणि तुम्ही कुठे जाल याचे ठिकाण ठरलेले असते. कारण आम्ही मुंबई पोलीस आहोत,' असं अमोल कांबळे यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत लिहिलं आहे.
या व्हिडिओमध्ये रॉबिन्सन हा एका वृद्ध व्यक्तीचा फोन चोरून पळून जाताना दिसत आहे. तेवढ्यात तो चुकून एका पोलिसाला जाऊन धडकतो. हा पोलीस अंगावरचं जॅकेट काढून आपला पोलीसी गणवेश उघड करतो. अमोल कांबळे यांचा गणवेश पाहून रॉबिन्सन त्या वृद्ध व्यक्तीकडून चोरलेला फोन परत करतो. त्यानंतर हे दोघेही 'Calm down' या रॅप गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
अमोल कांबळे यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करताच लोकांच्या पसंतीस उतरला आहे. तेव्हापासून त्याला ३ कोटी Views, १८ लाख Likes मिळाले आहेत. तब्बल १२ हजार लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये जाऊन या व्हिडिओबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर दोन लाख लोकांनी या व्हिडिओची लिंक इतरांसोबत शेअर केली आहे.
व्हिडिओ पाहून लोकांच्या उमटलेल्या प्रतिक्रिया…
या व्हिडिओवर इन्स्टाग्रावर लोकांनी भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
एका व्यक्तीने प्रतिक्रिया लिहिली… ‘किती मस्त व्हिडिओ आहे हा’
तर एक जण म्हणाला, ‘छान, कांबळे सर!’
तिसऱ्या व्यक्तिने लिहिलं, 'वेडा'
‘आज दिवसभरात पाहिलेल्या व्हिडिओपैकी सर्वोत्कृष्ट व्हिडिओ’ असं एकाने प्रतिक्रिया व्यक्त केली.
‘गुलाबी शरारा’ या गाण्यावर नोएल रॉबिन्सन याने अमोल कांबळे यांच्यासोबत आणखी एक व्हिडिओ शुट केला आहे. त्या व्हिडिओला इन्स्टाग्रामवर तब्बल ४५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओत रॉबिन्सनने मुंबई शहरात एका गजबजलेल्या रस्त्यावर कांबळेसोबत डान्स केला आहे. कांबळेंसोबत नाचण्यात मजा येते, असं नोएल रॉबिन्सनचं म्हणण आहे. 'जगातील सर्वात मस्त पोलिस' असे रॉबिन्सनने कांबळे यांना संबोधले आहे.
संबंधित बातम्या