Mumbai News: मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकावरील स्कायवॉकवर एका तरुणाने भटक्या कुत्र्यावर बलात्कार केल्याची घटना घडली. स्कायवॉकवरून जाणाऱ्या एका व्यक्तीने संबंधित तरुणाचे क्रूर कृत्य आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणीप्रेमींनी संबंधित तरुणाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकाच्या स्कायवॉकवर संबंधित तरुण भटक्या कुत्र्यावर बलात्कार करत असल्याचे एका व्यक्तीच्या लक्षात येते. त्यानंतर ही व्यक्ती किळसवाणा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करते. या व्यक्तीने तरुणाला तू काय करत आहेत? असा प्रश्न विचारत आहे. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून जातो. व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती काही अंतरापर्यंत त्याचा पाठलाग करते.
स्ट्रीटडॉग्स ऑफ बॉम्बे या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, '२९ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ३ वाजता मुंबईतील बोरिवली स्थानकाच्या स्कायवॉकवर एका भटक्या कुत्र्यावर अत्याचार केल्याचा हृदयद्रावक प्रकार घडला. अशा क्रूरतेला आपल्या समाजात स्थान नाही. अशा गुन्हेगाराला अटक झाली पाहिजे.'
पोस्टमध्ये नागरिकांना असे आवाहन करण्यात आले आहे की, ‘तुम्हाला या घटनेबद्दल काही माहिती असेल तर, पुढे या. आपण एकत्रितपणे पाण्यांवरील अत्याचाराविरुद्ध उभे राहू शकतो. प्राण्याच्या सुरक्षतेसाठी पाऊल उचलू शकतो. आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. तुमच्याकडे काही पुरावा असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा.’
या घटनेचा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर निष्पाप प्राण्यावर अत्याचार करणाऱ्याला कठोर शिक्षा व्हावी, अशा मागणीने जोर धरला आहे. भटक्या कुत्र्यावर अत्याचार केल्याची ही पहिलीच घटना नाही. या आधीही अशाप्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
संबंधित बातम्या