Viral News : भारत मॅट्रिमोनीबाबत मुंबईत राहणाऱ्या एका महिलेने धक्कादायक दावा केला आहे. भारत मॅट्रिमोनीच्या एलिट सबस्क्रिप्शन सेवेवर तिचा फोटो हा एका खोट्या प्रोफाइलवर लावण्यात आला आहे. या महिलेले सोशल मिडियावर पोस्ट करत कंपनीची पोलखोल केली असून टीची पोस्ट व्हायरल झाली आहे. यावर नेटकऱ्यांनी देखील अनेक प्रतिक्रिया दिल्या असून कंपनीने मात्र, या बाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
स्वाती मुकुंद असे या महिलेचे नाव असून तिचे लग्न झाले आहे. लग्नासाठी तिने कोणत्याही मॅट्रिमोनी बेबसाईटचा वापर केलेला नाही. दरम्यान, भारत मॅट्रिमोनीने तिचा फोटो हा फेक प्रोफाइलमध्ये लावल्याचे अनेक पुरावे तिने दिले आहे. तिने याला भारत मॅट्रीमोनी स्कॅम असे नाव दिले आहे. तसेच या सारख्या संकेतस्थळावर आयुषाचा जोडीदार शोधतांना सावधगिरी बागळण्याचे आवाहन केले.
व्हिडिओत भारत मॅट्रिमोनीची पोलखोल करतांना स्वाती मुकुंदने म्हटलं आहे की, भारत मॅट्रिमोनी हे संकेतस्थळ भारतातील पहिल्या क्रमांकाचे आणि विश्वसनीय विवाह ॲप असल्याचा दावा करते. मात्र, हे ॲप विश्वसनीय नसून भारत मॅट्रीमोनी स्कॅम म्हणावे लागेल, असे तिने म्हटले आहे. या बाबत पुरावा देखील तिने दिला आहे. एक स्क्रीनशॉट शेअर करून तिच्या फोटो खाली पूर्णपणे बनावट प्रोफाइलखाली तयार केल्याचं तिने व्हिडिओमध्ये दाखवलं आहे.
यावेळी स्वाती म्हणाली की, “तुम्ही बघू शकता, भारत मॅट्रिमोनीने माझे प्रोफाइल तयार केले आहे. मात्र, माझ लग्न झालं आहे. हा माझा नवरा आहे. आम्ही या सारख्या कोणत्याही वैवाहिक साइटवर भेटलो नाही. मला खरंतर भीती वाटते. ही भारतमॅट्रिमोनीची एलिट सबस्क्रिप्शन सेवा आहे. जिथे आयुष्याचा जोडीदार निवडण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांकडून पैसे आकारले जातात. तसेच वापरकर्ते या माध्यमातून योग्य जीवनसाथी शोधू शकतील असा दावा देखील करतात. मात्र, या प्रोफाइल फेक असल्याचं तीन व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
मुकुंदने सांगितलं की, भारत मॅट्रिमोनीने तिचा फोटो हा निथ्या राजा सेकर या नावाने वापरला असून ती चेन्नई तामिळनाडू येथील रहिवासी असल्याचं म्हटलं आहे. तसेच ती फिटनेस व्यावसायिक म्हणून ॲपच्या एलिट सबस्क्रिप्शन सर्व्हिस अंतर्गत तिची प्रोफाइल सूचीबद्ध करण्यात आली आहे. केले आहे. मात्र, माझे लग्न झाले आहे. स्वातीने भारत मॅट्रिमोनीच्या प्रोफाइलची पडताळणी करण्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले आहेत.
स्वाती मुकुंदने भारत मॅट्रिमोनीच्या वापरकर्त्यांना सतर्क करत तिच्या व्हिडिओचा शेवट केला आहे. तिने ही साईट वारण्यापूर्वी साईटच्या सर्व वापरकर्त्यांना त्यांच्या विवेकबुद्धीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. कारण तुम्ही या साईटवर जे पाहता ते खरे असेलचं याची काही खात्री नाही असे देखील तिने म्हटलं आहे.
सोशल मीडियावार तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच या विवाह ॲप्सबद्दल त्यांनी त्यांचे स्वतःचे अनुभव देखील शेअर केले आहे.
एकाने लिहिलं आहे की, “इथेही तेच. माझ्या फोटोचा वापर करून देखील अनेक प्रोफाइल तयार करण्यात आल्या होत्या. मी त्यांच्या ऑफिसची संपर्क साधून ही बाब लक्षात आणून दिली. या व्यक्तिनं म्हटलं आहे की, जेव्हा एखादी प्रोफाइल सर्च होते तेव्हा तेव्हा त्याचे अल्गोरिदम हायलाइट करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेले असते.
एक नेटकरी म्हणाला, “मी या प्रकारच्या साईटवर सर्च करतांना सर्व प्रकारची खबरदारी घेतो. यात नाव, जन्मतारीख आणि इतर तपशील आधार कार्ड आणि इतर सरकारी कागदपत्रांमधून पडताळनी करतो. परंतु प्रोफाइलमध्ये वापरलेले फोटो खरे आहे की खोटे हे सिद्ध करण्यासाठी नवा मार्ग सोधवा लागणार आहे.
दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटलं की, मी या साईटचा वापर गेल्या एका वर्षापासून करत आहे. या साईटवरील अनेक प्रोफाइल बनावट आणि संशयास्पद असल्याचे मला अनेकदा आढळले.
स्वाती मुकुंदच्या दाव्यांमुळे मॅट्रिमोनी ॲप्सच्या प्रोफाइल बद्दल शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. तिच्या व्हायरल व्हिडिओवर भारतमॅट्रिमोनीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.