Mhada Lottery News: मुंबईत स्वत:चे घरे घेण्याचे अनेकांचे स्वप्न असून या प्रयत्नात म्हाडाची मोठी मदत होते. गृहनिर्माण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने म्हणजेच म्हाडाने आतापर्यंत मुंबई शहर आणि उपनगरात म्हाडाच्या वसाहती आणि सदनिका बांधून शहरातील नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून दिली आहेत. आता पुन्हा म्हाडाने मुंबईत जवळपास २५०० घरे बांधण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली. ही घरे कुठे आणि किती बांधली जाणार आहेत आणि या घरांसाठी कधी लॉटरी निघणार? यासंबंधित सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
म्हाडातर्फे बांधण्यात येणारी ही घरे लॉटरीद्वारे विकली जाणार आहेत. त्यामुळे मुंबईत घर घेण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या प्रत्येक नागरिकांना या योजनेचा फायदा होणार आहे. मुंबईतील गोरेगाव येथे बांधण्यात येणाऱ्या एकूण घरांची संख्या लक्षात घेता हा म्हाडासाठी मोठा प्रकल्प असेल. या प्रकल्पांतर्गत एकाच ठिकाणी अधिक घरे बांधली जाणार आहेत.
मुंबईजवळील परवडणाऱ्या घरांच्या विक्रीला चालना देण्यासाठी म्हाडाने अनेक ठिकाणी माहिती केंद्रे उभारली आहेत. परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प मुंबईजवळ विरार, ठाणे आणि कल्याण सारख्या भागात आहेत. परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प मुंबईजवळ विरार, ठाणे आणि कल्याण सारख्या भागात आहेत. १४ हजारांहून अधिक परवडणाऱ्या घरांच्या विक्रीला चालना देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या मुख्याधिकारी रेवती गायकर यांनी सांगितले की, गृहनिर्माण योजनेला चालना देण्यासाठी रेल्वे स्थानक, पेट्रोल पंप आणि सरकारी कार्यालयांसह २९ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
म्हाडाकडे महाराष्ट्रभरात तीन हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची विक्री न झालेली घरे लक्षात घेऊन 'पहिले आवो, पहिले पाओ' योजनेंतर्गत परवडणारी घरे विकण्यासाठी पावले उचलली जात आहेत. ही घरे १५ ते २० लाख रुपयांपर्यंत असून ती विरार, ठाणे आणि कल्याण मध्ये आहेत.
संबंधित बातम्या