Mumbai restaurant Istanbul Darbar: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये मुंबईतील इस्तंबूल दरबार या रेस्टॉरंटबद्दल धक्कादायक दावा करण्यात आला आहे. एका पत्रकाराने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मुंबईतील कुर्ला पश्चिमेकडील रेस्टॉरंटमधील एक कर्मचारी फूड फ्राईंग नेटने नाला साफ करताना दिसत आहे. मात्र, फूड फ्राइंग नेट दिसणारे किचन उपकरण प्रत्यक्षात नालेसफाईसाठीच आहे, असे रेस्टॉरंटचे मालकाने स्पष्ट केले आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पत्रकार सिराज नूरानी यांनी लोकांना रेस्टॉरंटमध्ये तळलेले पदार्थ खाण्याचा इशारा दिला. मुंबईतील कुर्ला पश्चिम एलबीएस रोडवरील कल्पना थिएटरजवळ इस्तंबूल दरबार नावाचे हॉटेल आहे, ज्यात चविष्ट जेवण दिले जाते. तळलेले काही खाण्यापूर्वी काळजी घ्या. त्यामागचं सत्य जाणून घ्या, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये हॉटेलचे कर्मचारी चिकन फ्राईंग नेटच्या साहाय्याने नाल्यातील घाण साफ करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये कर्मचारी आपल्या गणवेशात आणि बूट साफ करताना दिसत आहे. त्यानंतर तो एका फूड फ्राईंग जाळीच्या मतदीने नाला साफ करताना दिसत आहे. एका व्यक्तीने त्याचे चित्रीकरण केल्याचे ही कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले; मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष करून साफसफाई सुरूच ठेवली. कचरा काढल्यानंतर कर्मचाऱ्याने नाल्याचा स्लॅब झाकला.
व्हिडिओ व्हायरल होताच अधिकृत रेस्टॉरंट हँडलने एक स्पष्टीकरण व्हिडिओ जारी केला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिण्यात आले आहे की “आपण ऑनलाइन पाहिलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका! इस्तंबूल दरबार आपल्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी कठोर स्वच्छता मानके राखतो. तुमचा विश्वास आमच्यासाठी सर्वकाही आहे.”
रेस्टॉरंटचे मालक शाहबाज शेख यांनी सांगितले की, फ्राइंग नेट-लुकिंग इक्विपमेंटचा खास वापर नाले साफ करण्यासाठी केला जातो. त्यांनी सोशल मीडिया वापरकर्त्यांना विनंती केली की, त्यांनी व्हायरल व्हिडिओवर विश्वास ठेवू नये कारण ते इतरांना बदनाम करण्यासाठी प्रसारित केले जातात.
एप्रिल महिन्यात अन्न सुरक्षा व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) नोएडातील दोन खाद्यपदार्थांच्या दुकानांवर छापे टाकले होते. नोएडा सेक्टर १८ मधील मॅकडोनाल्ड्स आउटलेट आणि सेक्टर १०४ मधील थिओब्रोमा बेकरीवर छापे टाकण्यात आले. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी खाद्यपदार्थांचे नमुने गोळा करण्यासाठी दुकानांवर छापा टाकला.
संबंधित बातम्या