Mumbai Local Train Updates: मध्य रेल्वेच्या वसई- दिवा रेल्वे मार्गावर बाडमेर- यशवंतपूर एक्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिव्यावरून वसईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या खोळंबल्या आहेत. ऐन गर्दीच्या वेळी एक्स्प्रेसमध्ये अचानक बिघाड झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वसई- दिवा मार्गावरील बाडमेर- यशवंतपूर एक्स्प्रेसमध्ये बिघाड झाला. परिणामी, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यानंतरर रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्तळी धाव घेतली. वसई विरारमधील बहुतांश नागरिक हे मध्यरेल्वेवर धावणाऱ्या वसई-दिवा- पनवेल या मार्गावरून प्रवास करतात. सेवा पूर्ववत होत नसल्याने काही प्रवाशांनी गाडीतून उतरून पायी प्रवास सुरु केला होता. जवळपास ३ तासांनी रेल्वे सेवा सुरळीत झाली आहे.