Mumbai Online Order News: डिजिटल व्यवहारप्रमाणे आता ऑनलाईन जेवण ऑर्डर करण्याच्या पद्धतीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते. भुकेने व्याकूळ झालेले लोक ऑनलाईन ऑर्डर केलेल्या जेवणाची काळजीपूर्वक तपासणी करण्याऐवजी त्यावर ताव मारायला सुरुवात करतात. मात्र, असा निष्काजीपणा एखाद्याला दवाखान्यातील औषध गोळ्या खाण्यास मजबूर करू शकतो. मुंबईतील वरळी परिसरात अशीच एक घटना घडली. ऑनलाईन जेवण ऑर्डर करणाऱ्या एका व्यक्तीच्या जेवणात चक्क मेलेले उंदीर आणि झुरळ आढळून आले. त्यानंतर संबंधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती मूळचा प्रयागराज येथील रहिवासी असून तो या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत आला होता. त्याने ८ जानेवारी रोजी वरळीतील एका हॉटेलमधून ऑर्डर केलेल्या दाल मखीनीत उंदीर आणि झुरळ आढळून आले. मात्र, समजण्यापूर्वी या व्यक्तीने दाल मखनी चाखली होती. ज्यामुळे त्याला गॅस्ट्रिकचा त्रास झाला. यानंतर त्याला बीएलव्हाय नायर रुग्णालयात धावा घ्यावी लागली.
राजीव शुक्ला असे रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राजीव शुक्ला हे वकील असून काही दिवसांपूर्वी मुंबईत दाखल झाले. त्यांनी ८ जानेवारी वरळी येथील बार्बेक्यू नेशन येथून जेवणाची ऑर्डर दिली. मात्र, त्यांच्या जेवणात मेलेले उंदीर आणि झुरळ आढळून आले. या अन्नातून त्यांना विषबाधा झाली. त्यानंतर त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी नागपाडा पोलिसांना माहिती देण्यात आली. मात्र, पोलिसांनी अद्याप त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही, अशी माहिती राजीव शुक्ला यांनी ट्विटरद्वारे दिली.
संबंधित बातम्या