Live Worms in Pizza: आवडीने पिझ्झा खाणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. एका व्यक्तीने ऑनलाइन ऑर्डर केलेल्या पिझ्झामध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर एकच खळबळ माजली. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.
'घरकेकलश' या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, भाऊने ऑनलाइन पिझ्झा ऑर्डर केला. पंरतु, त्यात अळ्या आढळल्या.' याशिवाय, कॅप्शनमध्ये एमपी असेही लिहिण्यात आले आहे. यावरून असे समजत आहे की, हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील आहे. मात्र, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे? हे अद्याप समजू शकलेले नाही. पंरतु, या व्हिडिओमुळे इंटरनेटवर खळबळ माजली आहे.
हा व्हिडिओ ८ नोव्हेंबर २०२४ रोजी ट्विटरवर शेअर करण्यात आला. या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास ९ लाख लोकांनी पाहिले आहे. तर, ५ हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक्स केले आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, हे घृणास्पद आहे. आता ऑनलाइन फूड ऑर्डर करणे जोखमीचे आहे. दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ऑनलाइन फूड ऑर्डर करणे चिंतेची बाब ठरली आहे. यामुळे मी कधीही ऑनलाइन जेवण ऑर्डर करत नाही. तिसऱ्या युजरने म्हटले आहे की, या घटनेची काटेकोर चौकशी होणे गरजेचे आहे. आणखी एका युजरने आपली निराशा व्यक्त करताना म्हटले आहे की, हे भयानक आहे. बरे झाले, हे खाण्यापूर्वीच लक्षात आले.
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका ग्राहकाने दिल्लीजवळील एका प्रसिद्ध मिठाईच्या दुकानातून खरेदी केलेल्या समोशामध्ये बेडकाचे पाय आढळून आले, ज्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अशा घटनांमुळे फूड आउटलेट्स आणि डिलिव्हरी सर्व्हिसेसमध्ये असलेल्या गुणवत्ता नियंत्रणाच्या उपाययोजनांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.