मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  आजारपणाच्या बहाण्याने पत्नी व शेजाऱ्यामध्ये सुरू होता रोमान्स, पतीने पाहिल्यावर दोघांना बेडवरच कुऱ्हाडीने तोडले

आजारपणाच्या बहाण्याने पत्नी व शेजाऱ्यामध्ये सुरू होता रोमान्स, पतीने पाहिल्यावर दोघांना बेडवरच कुऱ्हाडीने तोडले

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 08, 2023 04:14 PM IST

wifeandneighbour loveaffair : एका ३५वर्षीय व्यक्तीने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयातून पत्नी व शेजारी राहणाऱ्या तिच्या प्रियकराची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

मध्य प्रदेशमधील निवाडी येथे डबल मर्डरचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. निवाडी शहरापासून जवळपास चार किलोमीटर दूर कैना गावात सोमवारी एका ३५ वर्षीय व्यक्तीने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयातून पत्नी व शेजारी राहणाऱ्या तिच्या प्रियकराची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली.

ट्रेंडिंग न्यूज

निवाडी पोलीस अधीक्षक अंकित जायसवाल यांनी सांगितले की, आरोपी रामगोपाल कुशवाहा याने आपली पत्नी अनिता (३०)आणि शेजारी घनश्याम रायकवार (३५) यांना आपल्या घरात नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर रागाच्या भरात त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले.

पोलिसांनी सांगितले की, घनश्याम रायकवार जादू-टोना आणि तंत्र-मंत्र करत होता. अनिता आजारी असल्याचा बनाव करून शेजारी राहणाऱ्या घनश्यामला आपल्या घरी बोलावून स्वत:वर काळी जादू करून घेत होती.

पतीरामगोपाल कुशवाहा याला पत्नी व शेजाऱ्यामध्ये असणाऱ्या प्रेमसंबंधाची कुणकुण लागला होती. त्यांना रंगेहात पकडण्यासाठी त्याने सोमवारी कामानिमित्त घराबाहेर जाण्याचे नाटक केले व घराबाहेरच तो लपून राहिला. काही वेळाने त्याने शेजारी घनश्याम रायकवार याला घरात घुसताना पाहिले.

 

त्यानंतर काही वेळाने रामगोपाल घरात गेल्यानंतर पत्नी व शेजारी नको त्या अवस्थेत बेडवर पडलेले दिसून आले. यामुळे संतापलेल्या रामगोपाळने तेथे पडलेली कुऱ्हाड उचलून दोघांवर हल्ला केला. कुऱ्हाने वार दोघांची हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, कुशवाहा यालाभारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या)आणि अन्य संबंधित कलमांन्वये अटक करण्यात आली आहे.

WhatsApp channel