मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : ऐकावे ते नवलच ! 'या' गावात बकरीऐवजी चक्क बोकड देतो दूध; नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Viral Video : ऐकावे ते नवलच ! 'या' गावात बकरीऐवजी चक्क बोकड देतो दूध; नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 06, 2022 11:33 AM IST

Male Goat Giving Milk : बकरा दूध देतो असे म्हटले तर तुम्ही समोरच्याला मूर्ख म्हणणार. पण, हे खरे आहे. मध्यप्रदेशात बुरहानपूर येथे चक्क एक बोकड दूध देत असून याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

 'या' गावात बकरीऐवजी चक्क बोकड देतो दूध
'या' गावात बकरीऐवजी चक्क बोकड देतो दूध

बुरहानपूर : बकरी एवजी बोकड दूध देतो असे म्हटले तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला मूर्ख ठरवणार. तसेच असे वक्तव्य केल्याने तुम्ही त्याची टर्र देखील उडवणार. पण, हे खरे आहे असे सांगितल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल. हो, मध्यप्रदेशात बुरहानपूर येथे एका गोट फार्ममध्ये चक्क बोकड दूध देतांना दिसत असून याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. मूळचा मध्यप्रदेशांतील आणि महाराष्ट्रात पशूसंवर्धनचे शिक्षण घेतले असलेल्या तुषार निमाडे याचा हा गोट फार्म असून त्याच्या फार्म मधील बोकड दूध देत असल्याने हे पाहण्यासाठी आजू बाजूच्या गावातील नागरिक येत आहेत.

तुषार निमाडे पूर्वी नाशिकमध्ये एका कंपनीत अभियंता म्हणून काम करत होता. या ठिकाणी त्याला पशुवैद्यकीय डॉक्टर भेटले. त्याच्याकडून प्रेरणा घेत, त्याने पशुवैद्यकीय डॉक्टरचा कोर्स करत स्वत: शेळी पालन करण्याचे ठरवले. या साठी तो त्याच्या मुळ गावी बुरहानपूरला परतला. या ठिकाणी त्याने सरताज गोट फार्म सुरू करत विविध राज्यातून चंगल्या जातीच्या १२ शेळ्या आणि बकरे आणले. त्यांची विशेष काळजी घेत त्याने हा व्यवसाय वाढवला आहे. या शेळयापैकी चार बोकड हे शेळ्यांसारखे दूध देत आहेत. तब्बल २५० ते ३०० मिली दूध देत आहेत. दूध देणारे बोकड हे पंजाबचा बिटल प्रजातीचा बोकड, भिंड मुरैना येथील हंसा बोकड, हैद्राबादहून हैदराबादी बोकड, अहमदाबादहून पाथीरा येथून आणले आहेत.

बीटल प्रजातीच्या बोकडचे नाव बादशाह आहे. त्याची किंमत २ लाख १० हजार रुपये आहे, भिंड मोरेना येथील हंसा जातीच्या बोकडचे नाव सुलतान असून त्याची किंमत ३ लाख ५० हजार रुपये आहे, हैदराबादी बोकडचे नाव हैदराबादी चाचा असून त्याची किंमत १ लाख ८० हजार रुपये आहे, तर अहमदाबाद येथील पाथिरा जातीच्या बोकडचे नाव शेरू असून त्याची किंमत १ लाख ७५ हजार रुपये आहे. या बोकडांचा दूध देतांनाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी मात्र, हा व्हिडिओ चंगलाच ट्रोल केला आहे.

IPL_Entry_Point

विभाग