मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बर्निंग कारचा थरार.. धावत्या कारला आग; ४ मित्रांनी उड्या मारून वाचवला जीव, VIDEO

बर्निंग कारचा थरार.. धावत्या कारला आग; ४ मित्रांनी उड्या मारून वाचवला जीव, VIDEO

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 14, 2022 02:29 PM IST

राजस्थानमध्ये भरतपूर-मथुरा महामार्गावर एका धावत्या कारला अचानक आग लागली. आग लागल्यानंतर कारमधील चार जणांनी बाहेर उड्या मारून स्वत:चा जीव वाचवला. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली.

धावत्या कारला आग
धावत्या कारला आग (HT)

राजस्थानमधील भरतपूर येथे एका धावत्या कारला अचानक आग लागली. कारमध्ये प्रवास करणाऱ्या चार तरुणांनी धावत्या कारमधून बाहेर उड्या मारून स्वत:चा जीव वाचवला.या आगीत कार जळून खाक झाली आहे. ही घटना भरतपूर-मथुरा महामार्गावर घडली. लोकांनी जळत्या कारचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला.


मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री दिल्लीत राहणारे सुनील कुमार आपल्या तीन मित्रांसोबत कारमधून राजस्थानही दिल्लीकडे जात होते. त्यावेळी कारला अचानक आग लागली. सुनील व त्यांच्या मित्रांनी धावत्या कारमधून उड्या मारल्या व आपला जीव वाचवला. महामार्गावर जळत्या कारला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी उसळली होती.

घटनेची माहिती मिळताच रारह पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले व अग्निशमक दलाला पाचारण केले. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

IPL_Entry_Point