मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  चटणीत तरंगताना दिसला जिवंत उंदीर; हॉस्टेलच्या मेसमधील किळसवाणा प्रकार, पाहा VIDEO

चटणीत तरंगताना दिसला जिवंत उंदीर; हॉस्टेलच्या मेसमधील किळसवाणा प्रकार, पाहा VIDEO

Jul 09, 2024 08:02 PM IST

Rat Found Alive in Chuteny: व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसते की, चटनीने भरलेल्या भांड्यात जिंवत उंदीर बाहेर पडण्यासाठी धडपडत आहे. सांगितले जात आहे की, हॉस्टेलच्या मेसमधील चटणीत ८ जुलै रोजी उंदीर सापडला होता.

चटणीत तरंगताना दिसला जिवंत उंदीर
चटणीत तरंगताना दिसला जिवंत उंदीर

गुजरातमधील एका हॉटेलमध्ये एका ग्राहकाच्या जेवणात मेलेला उंदीर आढळला होता. तशीच घटना हैदराबादमध्ये घडली आहे. येथील जवाहरलाल नेहरू टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात एक जिवंत उंदीर चटणीत तरंगताना दिसला आहे. यानंतर वसतिगृहाच्या मेसमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. या प्रकाराबाबत विद्यार्थ्यांनी कॉलेज व्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे.

हैदराबादच्या जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल यूनिवर्सिटी (JNTUH)च्या वस्तीगृह प्रशासनाचा मोठा बेजबाबदारपणा समोर आला आहे. येथे शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला दिलेल्या चटणीत एक जिंवत उंदीर तरंगताना दिसला. हे पाहून त्याला धक्का बसला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसते की, चटनीने भरलेल्या भांड्यात जिंवत उंदीर बाहेर पडण्यासाठी धडपडत आहे. सांगितले जात आहे की, हॉस्टेलच्या मेसमधील चटणीत ८ जुलै रोजी उंदीर सापडला होता.

स्वच्छ व शुद्ध भोजन सर्वांना आवडत असते. मात्र पॅकेज्ड फूड आणि हॉटेल्समध्ये मिळणाऱ्या जेवणात कीटक आढळणे चिंतेचा विषय बनला आहे. कधी पॅकेट बंद खाण्यात बेडूक आढळला होता. तर कधी कोल्ड ड्रिंकच्या बाटलीत कोष्टी आढळला. काही दिवसापूर्वी गुजरातमधील एका हॉटेलमधील जेवणात मेलेला उंदीर आढळला. आता हैदराबादमधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मंगळवारी व्हायरल झालेल्या हा व्हिडिओ आतापर्यंत ५० हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यावरून हॉस्टेलच्या मेसमधील जेवणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. नेटिझन्सने कॉलेज व्यवस्थापनास यासाठी जबाबदार धरले आहे.

सोशल मीडियावर हैदराबादमधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, एका भांड्यात पिवळी चटणी ठेवली आहे. त्यामध्ये एक उंदीर तरंगत आहे. काही विद्यार्थी याचा व्हिडिओ बनवत आहे. मेसमधील जेवणात उंदीर कसा आला याबाबत कॉलेजकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. एका यूजरने लिहिले की, उंदरासाठी हे स्विमिंग पूल सारखे आहे. गंमत राहू दे बाजुला प्रशासनाने निरीक्षण करावे तसेच आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी. अन्य एका यूज़रने लिहिले की, हैदराबादमधील ८० टक्के रेस्टोरेंट एकाच प्रकारचे भोजन तयार केले जाते.

अन्य एका युजरने लिहिले की,चटनीत उंदीर सापडणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. याकडे दुर्लक्ष करू नये.@ivdsai नावाच्या एका यूजरनेतक्रार केली आहे की, जर फूड क्वॉलिटीबाबत कोणी तक्रार केली तर त्याला वसतीगृह सोडण्यास सांगितले जाते. जेव्हाहॉस्टलसोडले जाते तेव्हा अनामत रक्कमही दिली जात नाही. जरहॉस्टेलमध्ये असे जेवण दिले तर मुले कुठे जाणार?ते रोज बाहेर खाऊ शकत नाहीत. काही लोकांनी सल्ला दिला आहे की, घरचे जेवणच चांगले आहे.

WhatsApp channel