fight over dal makhani and butter chicken : बटर चिकन आणि दाल मखनीची नावं ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. हॉटेलमध्ये गेल्यावर या दोन्ही पदार्थावर तुम्ही ताव मारत असालही. मात्र, आता या दोन पदार्थवरुन एक वाद पेटला आहे. दोन रेस्टॉरंटमध्ये हा वाद सुरू आहे. या वादाच कारण ऐकून मात्र, तुम्ही हैराण व्हाल. हे दोन पदार्थ आधी कुणी बनवले यावरून हा वाद सुरू असून आता हा वाद थेट हायकोर्टात पोहोचला आहे. खरं तर, बटर चिकनच्या सर्वात आधी तयार करण्याबाबत एका मुलाखतीदरम्यान मोती महलच्या मालकांनी केलेल्या अपमानजनक व्यक्तव्याविरोधात दर्यागंज रेस्टॉरंटने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मोती महलच्या मालकाने दावा दाखल केला आहे की त्यांचे पूर्वज दिवंगत कुंदन लाल गुजराल यांनी बटर चिकन आणि दाल मखनीचा शोध लावला होता, तर दर्यागंज-2 रेस्टॉरंट्स पदार्थांच्या उत्पत्तीबद्दल लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेलती आहे. न्यायमूर्ती संजीव नरुला यांच्या खंडपीठाने मोती महलच्या मालकांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी प्रकाशित केलेल्या लेखांमध्ये तसेच केलेल्या विधानांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
या विरोधात दर्यागंज-२ रेस्टॉरंटने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी म्हटले आहे की, लेखातील बदनामीकारक विधाने ही चिंताजनक आहे. हा लेख प्रथम वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित झाला आणि नंतर प्रसारित करण्यात आला. तर इतर वेबसाइट्सद्वारे देखील हा लेख पुनर्मुद्रित करण्यात आला. या विरोधात दर्यागंज रेस्टॉरंटने असा युक्तिवाद केला आहे की लेखात प्रकाशित केलेला मजकूर त्यांच्या रेस्टॉरंट साखळीच्या प्रतिष्ठेवर नकारात्मक परिणाम करणारा आहे. मोती महलच्या मालकांनी मात्र, रेस्टॉरंटने केलेल्या व्यक्तव्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे.
बटर चिकन आणि डाळ मखनीचा शोध लावल्याचा दावा या दोन्ही रेस्टॉरंटचे मालक अनेक वर्षांपासून करत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला मोती महलने दोन्ही पदार्थ तयार करण्याचे श्रेय घेण्यासाठी आणि त्यावर त्यांच्या मालकीचा दावा करण्यासाठी दर्यागंज-२ वर दावा केला होता. मोती महलच्या मालकांनी दर्यागंज रेस्टॉरंटच्या मालकांना त्यांचे पूर्वज दिवंगत कुंदन लाल जग्गी यांनी या दोन पदार्थांचा शोध लावल्याचा दावा चुकीचा असल्याचे म्हटले असून असे व्यक्तव्य करण्यापासून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
संबंधित बातम्या