मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : चौथ्या मजल्यावर पडता पडला बचावला चिमुकला, तु काय करत होती? ट्रोलिंगला कंटाळून आईने संपवले आयुष्य

Viral News : चौथ्या मजल्यावर पडता पडला बचावला चिमुकला, तु काय करत होती? ट्रोलिंगला कंटाळून आईने संपवले आयुष्य

May 20, 2024 08:20 PM IST

Mother Suicide : बालक चौथ्या मजल्यावरून कोसळत असलेल्या या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर महिला सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागली. या ट्रोलिंगमुळे महिला इतक्या मानसिक तनावात आली की, तिने आत्महत्या केली.

ट्रोलिंगला कंटाळून आईने संपवले आयुष्य
ट्रोलिंगला कंटाळून आईने संपवले आयुष्य

तामिळनाडूमधील कोईमतूरमध्ये एका महिलेने सोशल मीडियावर ट्रोल झाल्यामुळे नैराश्येतून आपले जीवन संपवले आहे. सांगितले जात आहे की, आत्महत्येच्या तीन आठवड्याच्या आधी याच महिलेच्या हातातून तिचा आठ महिन्याचा मुलगा अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर खाली पडला होता. मात्र तिसऱ्या मजल्यावरील लोकांनी त्याला सुखरुप वाचवले होते. मात्र या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर महिला सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागली. या ट्रोलिंगमुळे महिला इतक्या मानसिक तनावात आली की, तिने आत्महत्या केली. 
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी कोईमतूर येथे एका महिलेचा (वय ३३ वर्ष) मृतदेह तिच्या आई-वडिलांच्या घरात आढळून आला. घटनेवेळी महिलेचे आई-वडील कामानिमित्त घराबाहेर होते. महिला आणि तिचा पती चेन्नईमध्ये एका आयटी कंपनीत काम करत होते.  

ट्रेंडिंग न्यूज

करमादाई पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ती आपल्या पती व दोन मुलांसह दोन आठवड्यापूर्वी चेन्नईहून कोईमतूरला आपल्या आई-वडिलांना भेटालया आली होती. शनिवारी तिचे आई-वडील व पती घराबाहेर गेल्यानंतर तिने टोकाचा निर्णय घेत आपले जीवन संपवले. कोईमतूरमधील करमादाई पोलीस ठाण्यात आयपीसी कलम १७४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महिलेचा मृतदेह मेट्टुपालयम सरकारी रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या घटनेचा तपास सुरू आहे.

बेजबाबदारपणाबद्दल ट्रोल झाली होती महिला
सांगितले जात आहे की, गेल्या २८ एप्रिल रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये आठ महिन्याचा एका बालक पत्र्याच्या छतावर लटकले होते. सांगितले जात होते की, बालक अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनीतून आपल्या आईच्या हातातून सटकले होते व पत्र्याच्या छतावर अडकले होते. चिमुकला दोन मजले खाली येऊन एका पत्र्यावर अडकले होते. आईने आरडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी कसेबसे त्याला सुखरुप वाचवले होते. याचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

महिलेच्या कुटूंबीयांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, महिला या दु:खद घटनेनंतर नैराश्येत गेली होती. त्याचबरोबर सोशल मीडियावर सतत ट्रोल झाल्यामुळे ती पूर्णपणे उध्वस्त झाली होती. बेजबाबदारपणाबद्दल तिला टोकाची टीका सहन करावी लागत होती.

चिमुकल्याला कसे रेस्क्यू केले ?
व्हायरल झालेल्या तीन मिनिटांच्या व्हिडिओत तीन लोकांनी मुलाला रेस्क्यू करताना दाखवले आहे. ते पहिल्या मजल्याच्या छतावर चढून मुलाला रेस्क्यू करताना दिसत आहेत. बालक जमिनीवर कोसळण्याच्या शक्यतेने जमिनीवर गाड्या अंथरल्या जातात. मात्र मुलाला एक व्यक्ती पकडतो व सुखरुप खाली घेतो. त्यानंतर मुलाला त्याच्या आईकडे सोपवले जाते. घटनेनंतर बालक पूर्णपणे स्वस्थ होते, मात्र सोशल मीडियावर लोकांनी या घटनेचा संपूर्ण दोष महिलेला दिला व तिच्यावर टीका करण्यात आली. सोशल मीडियावर महिलेला टोकाची ट्रोलिंग सहन करावी लागली.

टी-२० वर्ल्डकप २०२४