मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  नात्याला काळिमा! ज्याला मुलगा म्हणून सांभाळलं, त्याच्याशीच ठेवले लैंगिक संबंध, नातं तोडताच मारली गोळी

नात्याला काळिमा! ज्याला मुलगा म्हणून सांभाळलं, त्याच्याशीच ठेवले लैंगिक संबंध, नातं तोडताच मारली गोळी

May 22, 2024 05:05 PM IST

Mother Son Relation : ब्राझिलमध्ये समोर आलेल्या घटनेने या आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासला आहे. येथे एक आईचे आपल्या सांभाळलेल्या मुलाशीच अनैतिक संबंध होते.

ज्या मुलाला सांभाळले आईने त्याच्याशीच ठेवले लैंगिक संबंध
ज्या मुलाला सांभाळले आईने त्याच्याशीच ठेवले लैंगिक संबंध

आई आणि मुलाचे नाते पवित्र मानले जाते. मात्र ब्राझिलमध्ये समोर आलेल्या घटनेने या आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासला आहे. येथे एक आईचे आपल्या सांभाळलेल्या मुलाशीच अनैतिक संबंध होते. दोघांमध्ये अनेक वर्षे शारिरिक संबंध होते. जेव्हा मुलाने संबंध पुढे सुरु ठेवण्यास नकार दिल्यावर रागाच्या भरात महिलेने त्याची गोळी घालून हत्या केली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आईने मुलाच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केली. आरोपी महिलेले अटक करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिररच्या रिपोर्टनुसार, आरोपी महिलेचे नाव जेसिका बारबोसा संपाइओ (वय २९) असे आहे. जेसिकावर तिने सांभाळ केलेल्या २१ वर्षीय मुलगा सॅमुअल अल्वेसच्या हत्येचा आरोप आहे. सांगितले जात आहे की, सॅमुअल जेव्हा १४ वर्षांचा होता तेव्हा त्याने आई-वडिलांचे घर सोडले होते. तेव्हापासून तो जेसिका आणि तिच्या पतीसोबत रहात होता. ही घटना ब्राझीलच्या मारब परिसरातील आहे. पोलिसांनी सॅमुअलचा मृतदेह जेसिकाच्या घरातून ताब्यात घेतला.

दरम्यान जेव्हा पोलिसांनी जेसिकाला पकडले तेव्हा तिने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तिने सांगितले की, सॅमुअलचा मृत्यू एका अपघात आहे. तिच्या हातून चुकून गोळी लागली गेली. पोलिसांना सॅमुअलच्या डोक्याच्या मागील बाजुस गोळीचे व्रण दिसले आहेत.

जेसिका आणि सॅमुअलमध्ये अनैतिक नाते - 
पोलिसांनी सांगितले की, सॅमुअल जेव्हा किशोरवयीन होता, तेव्हा त्याने आपल्या आई-वडिलांचे घर सोडले होते. चांगल्या आयुष्याच्या शोधात असताना त्याची ओळख जेसिकाशी झाली. येथे तो जेसिकाच्या पतीचसोबत त्यांच्या दुकानात काम करत होता. आपल्या नवीन घरात तो जेसिका आणि तिच्या पतीसोबत रहात होता. तपासात समोर आले की, सॅमुअल आणि जेसिका यांच्यात अफेअर होते. सॅमुअलने तिच्याशी नाते तोडून घर सोडणार असल्याचे सांगितल्यावर जेसिका वेडीपिसी झाली. तिने याचा बदला घेण्यासाठी तिने सॅमुअलच्या डोक्यात गोळी मारली.

अशाच प्रकारची घटना या महिन्याच्या सुरुवातीला थायलंडमधून समोर आली होती. येथे ४५ वर्षीय राजकीय नेत्या प्रापापों चीवाडकोह यांच्यावर आपल्या दत्तक घेतलेल्या मुलासोबत लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप लावले होते. रिपोर्टनुसार महिलेच्या पतीला दोघांमधील अनैतिक संबंधाचा संशय आला तेव्हा तो अचानक घरी आला व दोघांना नको त्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर त्याने केलेल्या तक्रारीनंतर महिलेला आपले राजकीय पद गमवावे लागले होते.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग