मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  दोन मुलांच्या आईचा २० वर्षाच्या तरुणावर जडला जीव, पतीला सोडून प्रियकरासोबत राहण्याचा करू लागली हट्ट

दोन मुलांच्या आईचा २० वर्षाच्या तरुणावर जडला जीव, पतीला सोडून प्रियकरासोबत राहण्याचा करू लागली हट्ट

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 19, 2024 12:09 AM IST

दोन मुलांच्या आईचा परिसरात राहणाऱ्या एका तरुणीशी सूत जुळले. त्यानंतर तिने पुढचा मागचा काहीच विचार न करता दोन मुलांना व पतीला सोडून ती प्रियकराच्या घरात राहू लागली.

दोन मुलांना सोडून महिला प्रियकरासोबत फरार
दोन मुलांना सोडून महिला प्रियकरासोबत फरार

यूपीच्या अमरोहा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे दोन मुलांची आई असणारी ३७ वर्षीय महिला २० वर्षीय तरुणाच्या प्रेमात पडली. प्रेमात ती इतकी वेडी झाली की, मुले व पतीला सोडून ती प्रियकरासोबत राहू लागली. दुसरीकडे पत्नी घरातून बेपत्ता झाल्याने पतीने पोलीस ठाणे गाठून पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. रविवारी पोलिसांनी महिलेला शोधून काढले. महिलेने पोलीस ठाण्यात गोंधळ घालत पतीला सोडून प्रियकरासोबत राहण्याचा हट्ट करू लागली. 

हा प्रकार बिलारी ठाणे क्षेत्रातील एका गावातील आहे. येथे राहणाऱ्या दोन मुलांच्या आईची ओळख परिसरात राहणाऱ्या तरुणाशी झाली. ३७ वर्षीय महिलेची तरुणासोबत असणारी मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. ११ मार्च रोजी महिला प्रियकराच्या घरात राहायला गेली. सगळीकडे शोधल्यानंतरही तिचा काहीच पत्ता न लागल्याने तिच्या पतीने १५ मार्च रोजी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. रविवारी पोलिसांनी महिलेला शोधून काढले. तिचा पती व दोन मुलेही पोलीस ठाण्यात आले.

मुलांकडे पाहूनही महिलेला पाझर फुटला नाही, तिने प्रियकरासोबत राहण्याची इच्छ व्यक्त केली. तर तिची मुले संबंधित तरुणावर कारवाई करण्याची मागणी करत होते. पोलीस ठाण्यातच हा गोंधळ सुरू होता. पोलिसांनी सांगितले की, महिलेला सेफ हाउस पाठवले आहे. कोर्टात महिलेच्या साक्षीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

IPL_Entry_Point

विभाग