६ मुलांची आई भिकाऱ्याच्या प्रेमात झाली वेडी; पतीसह कुटूंबाला सोडून प्रियकरासोबत झाली फरार, चक्रावून टाकणारी लव्हस्टोरी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ६ मुलांची आई भिकाऱ्याच्या प्रेमात झाली वेडी; पतीसह कुटूंबाला सोडून प्रियकरासोबत झाली फरार, चक्रावून टाकणारी लव्हस्टोरी

६ मुलांची आई भिकाऱ्याच्या प्रेमात झाली वेडी; पतीसह कुटूंबाला सोडून प्रियकरासोबत झाली फरार, चक्रावून टाकणारी लव्हस्टोरी

Jan 08, 2025 10:19 PM IST

Beggar Love Story : प्रेमप्रकरणाचे दररोज वेगवेगळे किस्से ऐकायला आणि बघायला मिळतात, पण हरदोईमधील हे प्रकरण धक्कादायक आणि समाजमन अस्वस्थ करणारे आहे. येथे एक सहा मुलांची आई पती व मुलांना सोडून भिकाऱ्यासोबत पळून गेली आहे.

महिला भिकाऱ्यासोबत फरार
महिला भिकाऱ्यासोबत फरार

Mother of Six Children Absconded With Beggar: उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यातील एक अजब लव्ह स्टोरी समोर आली आहे. येथे सहा मुलांची आई एका भिकाऱ्याच्या प्रेमात पडली. हा भिकारी दररोज महिलेच्या घरी भीक मागण्यासाठी येत होता. त्यांच्या ओळखीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले व शेवटी महिलेने आपली मुले व पतीला सोडून भिकारीसोबत फरार झाली.

प्रेमप्रकरणाचे दररोज वेगवेगळे किस्से  ऐकायला आणि बघायला मिळतात, पण हरदोईमधील हे प्रकरण धक्कादायक आणि समाजमन अस्वस्थ करणारे आहे. येथे सहा मुलांची एक महिला अशा पुरुषाच्या प्रेमात पडली ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. ती ज्याच्या प्रेमात पडली तो ना नोकरदार होता, ना बिझनेसमन तर ही महिला एका भिकाऱ्याच्या प्रेमात पडली. यामुळे प्रेम हे आंधळे असते ही म्हण तंतोतंत खरी ठरली. भिकारी भीक मागण्यासाठी आल्यानंतर दोघांची नजरानजर झाली व महिला बाजारात जाण्याच्या बहाण्याने घरातून पसार झाली. दोघांच्या प्रेमप्रकरणाची पतीला कल्पनाही नव्हती. 

हा संपूर्ण प्रकार हरपालपूर कोतवाली भागात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू नावाच्या तरुणाने पोलिस स्टेशन गाठून गुन्हा दाखल केला. पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत तरुणाने म्हटले आहे की, त्याची पत्नी सहा मुलांना सोडून एका भिकाऱ्यासोबत पळून गेली. पीडिताचे म्हणणे आहे की, मोहल्ला खिडकियान येथे राहणारा भिकारी अनेकदा त्याच्या घरी भीक मागण्यासाठी येत असे. भीक मागताना त्याची बायको एका भिकाऱ्याच्या प्रेमात कधी पडली याचा त्याला सुगावाच लागला नाही. पत्नी अनेकदा त्या भिकाऱ्याशी बोलत असे, परंतु त्याने कधीच याकडे लक्ष दिले नाही.

एके दिवशी त्याच्या पत्नीने त्याला भाजी आणि बाजारातून कपडे आणायचे असल्याचे सांगितले. यामुळे त्ण्यायाने तिला बाजारात जाण्याची परवानगी दिली, परंतु ती परत आलीच नाही. बराच वेळ त्याची पत्नी बाजारातून न परतल्याने त्याने शोधाशोध सुरू केली. चौकशी केली असता त्यांच्या पत्नीला भिकाऱ्याने पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. म्हशी आणि माती विकून घरात साठवलेले पैसेही पत्नीने काढून घेतल्याचे पीडिताने सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिताने भिकाऱ्याविरोधात पत्नीला पळवून नेल्याची तक्रार दाखल केली असून पत्नीला शोधण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

पतीच्या मारहाणीला कंटाळून पत्नी गेली होती नातेवाईकाच्या घरी -

लामकान गावातील एका तरुणाने मोहल्ला खिडकिया येथील रहिवासी असलेल्या भिकाऱ्यासोबत पत्नी घरातील सर्व पैसे व दागिने घेऊन फरार झाल्याची तक्रार पोलिसात केली होती. या प्रकरणी महिलेने मंगळवारी कोतवाली गाठून संपूर्ण घटनेचा पर्दाफाश केला. मंगळवारी सकाळी हरपालपूर पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या महिलेने सांगितले की, तिचा पती राजू तिला मारहाण आणि शिवीगाळ करायचा. याला वैतागून ती फर्रुखाबाद येथे आपल्या नातेवाईकाच्या घरी गेली होती. तिचे कोणाशी तरी संबंध असल्याचा आरोप पूर्णपणे खोटा आणि निराधार आहे. हरपालपूरच्या सर्कल ऑफिसर शिल्पा कुमारी यांनी सांगितले की, आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे. चौकशी करून कारवाई केली जाईल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर