बिहारमधील मुंगेरमधून एक बातमी समोर आली आहे, जिथे पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून पतीने आत्महत्या केली. शबे बरातच्या रात्री दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि शुक्रवारी सकाळी पतीने आपले जीवन संपवले. या दोघांना पाच मुले आहेत, मात्र पत्नीचे गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कासिम बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हजरतगंज बार गल्ली नंबर ९ मध्ये ही घटना घडली. हे कुटुंब भाड्याच्या घरात राहत होते. मोहम्मद अरमान (३५) असे मृताचे नाव आहे. त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी पाच मुलांची आई आहे. पण तिचे एका पुरुषासोबत अनैतिक संबंध होते. शबे बारातच्या (१३ फेब्रुवारी) रात्री अरमानने आपल्या पत्नीला त्या व्यक्तीशी बोलताना पाहिले. यानंतर पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. शुक्रवारी सकाळी अरमानने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी कुटुंबीयांची स्वतंत्रपणे चौकशी केली. चौकशी अहवाल तयार करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. ही प्रामुख्याने आत्महत्या असल्याचे मानले जात आहे. गावात याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत.
संबंधित बातम्या