मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  tripura crime news : पोटच्या मुलाचा खून करून आई पोलिसांना म्हणाली, मला फाशी द्या; अजिबात पश्चात्ताप नाही

tripura crime news : पोटच्या मुलाचा खून करून आई पोलिसांना म्हणाली, मला फाशी द्या; अजिबात पश्चात्ताप नाही

Jun 11, 2024 03:35 PM IST

agartala crime news : अभ्यास करत नाही आणि चोऱ्या करतो म्हणून वैतागलेल्या एका महिलेनं पोटच्या पोराचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोटच्या मुलाचा खून करून आई पोलिसांना म्हणाली, मला फाशी द्या; अजिबात पश्चात्ताप नाही
पोटच्या मुलाचा खून करून आई पोलिसांना म्हणाली, मला फाशी द्या; अजिबात पश्चात्ताप नाही

tripura crime news : सारखा चोऱ्या करतो आणि अभ्यासही करत नसल्यानं संतापलेल्या आईनं ९ वर्षांच्या पोटच्या मुलांचा दाबून खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. या घटनेमुळं खळबळ उडाली असून आजूबाजूच्या कुटुंबांना धक्का बसला आहे. आरोपी महिलेनं मुलाचा खून केल्याची कबुली दिली आहे. मला माझ्या कृत्याचा अजिबात पश्चात्ताप नाही. हवं तर मला फाशी द्या, असं आरोपी महिलेचं म्हणणं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

त्रिपुरातील आगरतळा इथल्या जॉयनगर भागात सोमवारी सायंकाळी ही खळबळजनक घटना घडली. सुप्रभा असं आरोपी महिलेचं नाव आहे. मुलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. तिला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली की ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा ती महिला घरात तिचा ९ वर्षांचा मुलगा राजदीप याच्या मृतदेहाजवळ बसली होती. पोलिसांनी मृतदेहाजवळून दोरी आणि बांबूची काठी जप्त केली आहे. आरोपी महिलेनं आपल्या मुलाच्या खुनासाठी या शस्त्रांचा वापर केल्याचा पोलिसांना संशय आहे.

नवरा बेपत्ता, मुलाच्या गैरवर्तनामुळं आई दुःखी

'या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. खुनच्या मागे इतर काही कारण नाही ना याचाही शोध घेतला जात आहे. आरोपी सुप्रभा बल ही उनाकोटी जिल्ह्यातील कैलाशहर इथली रहिवासी आहे. ती रोजंदारी मजूर म्हणून काम करते. तिचा नवरा बेपत्ता असून ती आपल्या मुलासह भाड्याच्या घरात राहत होती. महिलेनं तिच्या मोठ्या मुलीचे लग्न लावून दिलं आहे.

आईनं दिली खुनाची कबुली

पोलिसांनी घटनास्थळी विचारणा केली असता, आरोपी आईनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. ती म्हणाली की, तिच्या मुलाच्या वाईट वागणुकीमुळं ती दु:खी होती. तो पैसे चोरत असल्याच्या अनेक तक्रारी वारंवार माझ्याकडं येत होत्या. घरी एकटा असल्यावर तो काय करेल याचा नेम नसायचा. त्यामुळं मी कामावरही जाऊ शकत नव्हते. तो पैसे चोरायचा, कधीच अभ्यास करायचा नाही. त्याच्यामुळं लोकांनी मला कामावरून काढून टाकलं. त्यामुळं मला नकोसं झालं होतं. या सगळ्याला कंटाळून मी त्याला संपवले. यासाठी तुम्ही मला फाशी देऊ शकता. मला अजिबात खेद किंवा खंत नाही, असं ती निर्विकारपणे म्हणाली.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग