mother kill her eight year old son in hugli of west bengal : पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यात १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या ८ वर्षांच्या निष्पाप मुलाच्या निर्घृण हत्येचे गूढ उकलले आहे. कोननगर शहरातील श्रेयांशु शर्मा (वय ८) या मुलाच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. त्याच्या हत्येमागे त्याची आई आणि आईची लेस्बियन मैत्रीण असल्याचे उघड झाले आहे. आईच्या अनैतिक संबंध मुलाला कळले. तसेच त्याने नको त्या अवस्थेत दोघांना पहिले. यामुळे आपले बिंग फुटणार या भीतीने दोघांनी मिळून मुलाची निर्घृण हत्या केली. आईने आपल्या पोटच्या मुलाच्या डोक्यावर एका मूर्तीने आधी वार केले. तो बेशुद्ध झाल्यावर त्याच्या हाताच्या शिरा कापल्या, त्यानंतरही त्याचे समाधान झाले नाही म्हणून त्याने चाकूने त्याचे संपूर्ण शरीर छिन्न विच्छिन्न केले.
शांता शर्मा असे निष्ठुर आईचे नाव आहे. तर इशरत परवीन असे तिच्या मैत्रिणीचे नाव आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना कोन्नानगरच्या कनईपूर येथील आदर्श नगरमधील आहे. श्रीरामपूरचे डीसीपी अर्णब बिस्वास यांनी उत्तरपारा पोलिस ठाण्यात पत्रकार परिषदेत घेत या खुनाची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शांता आणि परवीन लग्नापूर्वीच्या मैत्रिणी होत्या आणि त्यांचे समलैंगिक संबंध होते. लग्नानंतरही ते वारंवार भेटत होते आणि समलैंगिक संबंध सुरूच होते. शांता २०१२ मध्ये आणि परवीनचे २०१८ मध्ये लग्न झाले. मात्र, काही महिन्यांतच परवीनने पतीचे घर सोडले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर परवीनचे कुटुंब नव्हते. परवीन कधी कधी शांताच्या घरी यायची. शांताचे देखी तिच्या पतीसोबतचे संबंध चांगले नव्हते. दोघेही एकमेकांच्या घरी जात असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांना माहीत होते. रात्री उशिरापर्यंत दोघी फोनवर बोलायच्या. शांताचा मुलगा श्रेयांशु याला दोघींच्या संबंधाची माहिती मिळाली. त्याने दोघींना खोलीत नको त्या अवस्थेत पहिले. ही गोष्ट कोणाला सांगेल, अशी भीती त्याला वाटत होती. यामुळे समाजात बदनामी होण्याची त्यांना भीती होती. त्यामुळे दोघींनी श्रेयांशुला मारण्याचा कट रचला.
परवीनने मुलाची हत्या केली असली तरी शांताने तिला या कामात पूर्ण मदत केली. पोलिसांनी मिळवलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शांता श्रेयांशुला सोबत घेऊन आल्याचे दिसून आले. जिथे परवीन आधीच हजर होती. प्रथम त्यांनी निष्पाप बालकाच्या डोक्यावर विट व गणेशमूर्तीने वार करून त्याला बेशुद्ध केले. यानंतर दोघींनी चाकूने त्याच्या हाताच्या नसा कापल्या. यानंतरही त्याचे समाधान न झाल्याने त्याने मुलाच्या अंगावर चाकूने असंख्य वार केले. मुलाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी परवीनही शांता यांना भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचली आणि दुख: व्यक्त करण्याचे नाटक केले.