मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेरमध्ये संपूर्ण कुटूंबाने आपले जीवन संपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे आई-वडील व मुलाने एकाच वेळी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सिरोल पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील आहे. येथे एका घरात राहणाऱ्या कुटूंबातील सर्व सदस्यांचे मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत मिळाले. या कुटूंबात तीन जण रहात होते.
शंका उपस्थित करण्यात येत आहे की, तीन जणांनी एकाच वेळी आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. या कुटूंबाने आपले जीवन का संपवले, याचा खुलासा घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटवरून झाला आहे.
सिरोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुरावली भागात राहणारे जितेंद्र झा बांधकाम मजुरीचे काम करतात. जितेंद्र पत्नी त्रिवेणी आणि मुलगा अचल झा त्यांच्यासोबत रहात होते. तिघांनी एकाच दिवशी आत्महत्या केली. घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठीवरुन या आत्महत्येचे धक्कादायक कारणही समोर आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसांपासून त्यांचे घर बंद होते. त्यांच्या घरातून दुर्गंधी येताना शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच सिरोल पोलीस घटनास्थळी पोहोचले.
घरामध्ये पती, पत्नी आणि मुलाचा मृतदेह दोरीला लटकत असल्याचे दिसले. तसेच जितेंद्र झा यांच्या हातावर ब्लेड, चाकूच्या खुणाही आहेत.
पोलिसांसोबतच फॉरेंसिक विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलिसांनी घरातून मोबाईल फोन जप्त केले आहेत. पोलिस आत्महत्या व हत्या दोन्ही अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहे. घटनास्थळी मुलगा अचल झा याच्याकडे एक चिठ्ठी सापडली. ज्यामध्ये एका व्यक्तीच्या नाराजीमुळे मुलाने आत्महत्या केली आता मीही आत्महत्या करणार आहे, असे म्हटले आहे. पोलीस या प्रकरणाचा आता अधिक तपास करत आहेत.