आई-मुलगी मिळून लावायचे हनीट्रॅप! मुलं फसून व्हायची कंगाल, काय आहे नेमके प्रकरण?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  आई-मुलगी मिळून लावायचे हनीट्रॅप! मुलं फसून व्हायची कंगाल, काय आहे नेमके प्रकरण?

आई-मुलगी मिळून लावायचे हनीट्रॅप! मुलं फसून व्हायची कंगाल, काय आहे नेमके प्रकरण?

Jan 10, 2024 11:57 AM IST

mother daughter honey trap gang : नोयडा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आई आणि मुलगी मिळून हनीट्रॅप लावून त्यात अनेक मुलांना अडकवून फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

noida crime
noida crime

noida crime : नोएडा येथील सूरजपूर कोतवाली पोलिसांनी हनी ट्रॅप टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीत आणि आणि मुलगी तसेच आणखी काही आरोपी हे तरुणांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांना पोलिसांत गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन पैसे उकळत होते. पोलिसांनी टोळीची म्होरक्या असलेली महिला तिची मुलगी आणि भाचीसह पाच जणांना अटक केली आहे.

Ecuador Gunmen कुख्यात गुंडाच्या समर्थकांचा टीव्ही चॅनेलमध्ये हैदोस; अँकरला उचलून नेले

या बाबत एडीसीपी सेंट्रल झोन हृदेश कथेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी विजय सिंह या युवकाने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. त्याची काही दिवसांपूर्वी कविता नावाच्या महिलेशी भेट झाली. कविताने त्याला कोणत्यातरी मुलीशी मैत्री करण्याचे आमिष दाखवत ७ जानेवारी रोजी त्याला सूरजपूर येथे बोलावले. दरम्यान, दोघेही दुचाकीवरून देवळा गावात गेले. या ठिकाणी कविताने एका मुलीला त्याच्यासोबत दुचाकीवर बसवले. दरम्यान, काही अंतर पुढे गेल्यावर काही लोकांनी त्यांना अडवले. तसेच त्याला मारहाण देखील करण्यास सुरू केली. दरम्यान, या तरुणीला पळून नेत असल्याचा आरोप त्यांनी तरुणावर केला. तसेच त्याला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. दरम्यान, आरोपींनी तरूणांकडून १२ हजार रुपये आणि मोबाईल घेतला. तसेच त्याला बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत पेटीएमचा पासवर्ड विचारला. यानंतर आरोपीने पेटीएमद्वारे विविध ठिकाणांहून १ लाख ४७ हजार रुपयांची खरेदी केली.

Accident: अभिनेता यशचा दुचाकीनं पाठलाग करताना वाहनानं उडवलं, २२ वर्षीय चाहत्याचा मृत्यू

दरम्यान, पीडित तरुणाने या प्रकरणी तक्रार दिल्यावर पोलिसांनी कारवाई करत या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी टोळीची म्होरक्या कविता, तिची अल्पवयीन मुलगी, भाची पूजा, फारुख आणि विष्णू उर्फ ​​डमरू यांना अटक केली आहे. पीडित विजयसिंग याच्याकडून घटनेत वापरलेला मोबाईल, कार देखील जप्त करण्यात आली आहे. या सोबतच मोबाईल, रोख ८२ हजार रुपये आणि खरेदी केलेला सुमारे ४० हजार रुपयांचा माल देखील जप्त करण्यात आला आहे. पोलिस सध्या या टोळीबाबत इतर माहिती गोळा करत आहेत. या टोळीने विविध पोलीस ठाण्यांवर अनेक गुन्हे केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

या टोळीने ५ जानेवारी २०२३ ला शेजारच्या तरुणाविरुद्ध विनयभंगाची घटना दाखल करून त्याला विनयभंग आणि POCSO च्या खोट्या गुन्हात अडकवले होते. पोलीस तपासात व न्यायालयात दिलेल्या जबाबाच्या आधारे हे प्रकरण खोटे असल्याचे निष्पन्न झाले.

२२ सप्टेंबर २०२३ रोजी, टोळीची लीडर कविता हिने सूरजपूर पोलिस स्टेशनमध्ये तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या तरुणावर तिचा विनयभंग केल्याचा आरोप करत अर्ज दाखल केला. नंतर तपासादरम्यान ही घटना खोटी असल्याचे आढळून आले.

२५ ऑक्टोबर २०२३ रोजी बीटा-२ पोलिस ठाण्यात एका तरुणावर बलात्कार/गर्भपात करण्यास भाग पाडले हा खोटा आरोप करून पोलिसांत तक्रार करण्यात आली. त्याच्याकडून चार लाख रुपये घेऊन तक्रार अर्ज आरोंनी मागे घेतला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर